आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

राजकीय मैदानातील क्रिकेटपटूंची वाटचाल यशस्वी का अयशस्वी, वाचा कोण आहेत ते क्रिकेटपटू…


क्रिकेट करियर संपल्यानंतर राजकीय आखाड्यात बरेच क्रिकेटपटू उतरतात, मात्र प्रत्येकाच्या वाट्याला यश येतंच असं नाही. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल आले आहेत, यात भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूचा पराभव झाला आहे. क्रिकेट करियर संपल्यानंतर राजकीय आखाड्यात बरेच क्रिकेटपटू उतरतात, मात्र प्रत्येकाच्या वाट्याला यश येतंच असं नाही. २०१९ लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीरचा  विजय झाला, तर मागच्यावर्षी झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज तिवारी आणि अशोक डिंडा यांना यश मिळालं.

पंजाब विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत, यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि भारताचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या असलेल्या सिद्धूंचा आपच्या जीवन ज्योत कौर यांनी ६,७५० मतांनी पराभव केला. कौर यांना ३९,५२० मतं तर सिद्धूंना ३२,८०७ मतं पडली.

नवोजत सिंग सिद्धू यांच्याआधी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यानेही राजकारणात आपलं नशीब आजमावलं. २००९ लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या तिकीटावर अझरचा उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद मतदारसंघातून विजय झाला होता, पण २०१४ ला राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये अझरला पराभवाचा धक्का बसला.

भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी हे राजकारणात प्रवेश करणाऱ्या पहिल्या क्रिकेटपटूंपैकी एक होते. भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या पतौडी यांनी दोनवेळा लोकसभा निवडणूक लढवली पण दोन्ही वेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव यांनी पतौडी यांच्यासाठी प्रचार केला, पण त्याचा फायदा पतौडींना झाला नाही. या दोन पराभवांनंतर पतौडी राजकारणातून बाहेर पडले.

१९८३ विश्वचषक विजेत्या टीमचे सदस्य कीर्ती आझाद भाजपच्या तिकीटावर तीनवेळा बिहारच्या दरभंगा मधून निवडणूक जिंकले, पण २०१९ ला काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा पराभव झाला. भारताकडून १२५ एकदिवसीय आणि १३ कसोटी खेळलेला मोहम्मद कैफ २०१४ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर प्रदेशच्या फूलपूर मतदारसंघातून निवडणुकीला उभा राहिला, पण त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं.

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यानेही निवडणूक लढवली होती. २००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकभारती पक्षाकडून कांबळी मुंबईच्या विक्रोळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला, भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू मनोज प्रभाकर हे सध्या भाजपचे सदस्य आहेत, पण १९९६ साली दिल्लीच्या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर मनोज प्रभाकर यांचा पराभव झाला होता.पण यात त्याला यश आलं नाही.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here