आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पिंक बॉल बरोबर दिवस-रात्र कसोटीत भारताचा इतिहास हा असा आहे!


भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना १२ मार्चपासून बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर खेळला जाणार आहे. हा सामना डे-नाईट असून पिंक बॉल नं खेळला जाणार आहे. भारतानं आतापर्यंत पिंक बॉलनं किती सामने खेळले आहेत? पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताची आतापर्यंतची कामगिरी कशी होती? यावर एक नजर टाकुयात.

भारतानं आतापर्यंत पिंक बॉलनं एकूण तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय.

बांग्लादेश विरुद्ध भारताचा ४६ धावांनी विजय

भारतानं २०१९ मध्ये पहिला पिंक बॉल कसोटी सामना बांग्लादेशविरुद्ध खेळला होता. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्डेडिअमवर खेळला गेला होता. या सामन्यात बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात बांगलादेशचा संघ अवघ्या १०६धावांत आटोपला. यानंतर कर्णधार कोहलीच्या शतकामुळं भारतानं ३४७ धावांवर डाव घोषित केला. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावातही फारसे काही करू शकला नाही. बांग्लादेशचा संघ १९५ धावांत ऑलआऊट झाला. ज्यामुळं भारतानं हा सामना ४६ धावांनी जिंकला.

दुसऱ्या पिंक बॉल कसोटीत भारताचा लाजीरवाणा पराभव

भारतानं दुसरा पिंक बॉल कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं पहिल्या डावात २४४ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला १९१ धावांत रोखून भारतानं ५३ धावांची आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या डावात भारताचा संघ ३६ धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. भारतानं दिलेल्या ९० धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघानं दोन विकेट गमावून पूर्ण केलं होतं.

तिसऱ्या पिंक बॉल कसोटीत अक्षर पटेलची चमकदार कामगिरी

भारतानं तिसरा पिंक बॉल कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध २०२१ मध्ये खेळला. हा कसोटी सामना खूपच मनोरंजक होता. या कसोटी सामन्यात इंग्लंडचा डाव ११२ धावांवर आटोपल्यानंतर भारताचा डावही अवघ्या १४५धावांवर आटोपला. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ ८१ धावांवर ऑलआऊट झाला. इंग्लंडनं दिलेलं ४९ धावांचं लक्ष्य भारतानं १० विकेट्स राखून गाठलं. या सामन्यात अक्षर पटेल सामनावीर ठरला. त्यानं ७० धावांत ११ विकेट घेतले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here