आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

गुलाबी चेंडू कसोटी सामन्यात ‘या’ भारतीय फलंदाजांनी खोऱ्याने धावा काढल्या आहे!


भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा गुलाबी चेंडू कसोटी सामना १२-१६ मार्चदरम्यान खेळला जाणार आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूनं खेळला जाणार आहे.  दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी उत्तम कामगिरी करून दाखवलीय. श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित आणि विराट मोठी खेळी करतील, अशी अपेक्षा केली जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदाच गुलाबी चेंडू कसोटी सामना खेळणार आहे.

भारतानं आतापर्यंत गुलाबी चेंडूनं एकूण तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय.  भारतानं  २०१९ मध्ये पहिला गुलाबी चेंडू कसोटी सामना बांग्लादेशविरुद्ध खेळला होता. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला होता. ज्यात ४६ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या गुलाबी चेंडू कसोटी सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. भारतानं अखेरचा गुलाबी चेंडू कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारतानं १० गडी राखून इंग्लंडचा धुव्वा उडवला होता.

गुलाबी चेंडू कसोटी भारताकडून शतक झळकावणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज आहे. तसेच गुलाबी चेंडू कसोटी सामन्यात भारतासाठी त्यानं सर्वाधिक धावा केल्या आहे. त्यानं तीन सामन्याच्या चार डावात ६०.२५ च्या सरासरीनं २४१ धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

गुलाबी चेंडू कसोटी सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं तीन डावात ११२ धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट आणि रोहित दोघेही भारतीय संघाचा भाग आहेत.श्रीलंकाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतलीय.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here