आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

नुकत्याच निवृत्त झालेल्या खेळाडूचे ‘या’ पाच अभिनेत्री सोबत नाव जोडण्यात आले होते!


क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य असलेला वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने बुधवारी (९ मार्च) सर्व प्रकारच्या देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त झाल्याचे जाहीर केली. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याच्यावर सात वर्षाची बंदी घालण्यात आली होती. बंदी उठवल्यावर त्याने २०२० मध्ये खेळण्यास सुरुवात केली होती.

श्रीसंत आयपीएलमध्ये किंग्ज ११ पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळला आहे. भारतीय संघाकडून खेळताना त्याने २७ कसोटी, ५३ एकदिवसीय आणि १० टी-20 सामने खेळले आहेत.

क्रिकेटच्या मैदानाबाहेरही श्रीसंत कायम विवादात राहिला आहे. त्याचा या पाच अभिनेत्रींशी संबंध असल्याचं बोललं जात होत. त्यापैकी एक सुरविन चावला ही आहे. हेट स्टोरी हा चित्रपट करणाऱ्या सुरविन आणि श्रीसंतची ओळख २००८ मध्ये झाली होती. त्यानंतर काही दिवस ते एकत्र राहिले आणि २००९ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं होतं.

श्रीसंत आणि रिया सेन यांच्या संबंधाचीही खूप चर्चा होती. २०११ मध्ये या दोघांचे काही फोटो व्हायरल झाले होते. युवराज सिंह सोबतची मैत्री न तोडल्यामुळे रिया श्रीसंतपासून दूर गेली होती. युवराजसोबतची मैत्री तुटल्यावर ते परत एकत्र आले होते.

साउथ इंडियनची अभिनेत्री राय लक्ष्मीसोबतही श्रीसंतचे संबंध असल्याचं बोललं जातं. या अभिनेत्रीचे नाव धोनीसोबतही जोडलं गेलं होत. यांचं रिलेशनही जास्त दिवस टिकलं नाही.

तसेच बॉलिवूडची दोन चित्रपट करणारी मिनिषा लांबा या अभिनेत्रीसोबतही त्याचे संबंध होते. सुरविनसोबतच्या ब्रेकअपनंतर यांच्यात मैत्री झाली होती. पण हेही रिलेशन जास्त दिवस टिकू शकलं नाही.

अजय देवगनच्या दृश्यम चित्रपटात काम करणाऱ्या श्रिया सरन हीच्यासोबतही त्याचे काही दिवस संबंध असल्याचं बोललं जातं. २००८ मध्ये त्यांना दोघांना एकत्र बघितल्याचं बोललं जातं. या दोघांचा विवाह होणार असल्याची अफवा पसरली होती पण श्रियाने स्व:ता श्रीसंतला आपल्यापासून दूर केले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here