आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

युजवेंद्र चहलला चक्क विराटच्या आरसीबी ने फसवलं? जाणून घ्या संपूर्ण गोष्ट फक्त एका क्लिकवर


आयपीएलच्या १५ व्या मोसमात युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्ससाठी खेळणार आहे. लेग स्पिनर युजवेंद्र चहलला राजस्थानच्या संघाने ६.५ कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. चहल याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून खेळत होता. त्याने या संघासाठी खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे. चहल आरसीबी साठी सर्वात मोठ्या मॅचविनर खेळाडू पैकी एक आहे. मात्र तरीही आरसीबीने त्याला रिटेन केलं नाही. टीमने ज्यावेळी रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली, त्यात चहलचं नाव नव्हतं. युजवेंद्र चहलने स्वत:च रिटेन होण्यासाठी नकार दिला, अशा बातम्या त्यानंतर आल्या. पण अखेर सत्य आता समोर आलं आहे. आरसीबीला मला कधीच रिटेन करायचं नव्हतं असं चहलने म्हटलं आहे. सोशल मीडियावर त्याला भरपूर सुनावण्यातही आलं.

“आरसीबीचे क्रिकेट डायरेक्टर माइक हेसन यांचा मला फोन आला होता. त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव मला सांगितली. हेसन यांनी ऑक्शनमध्ये आपल्यावर बोली लावण्याचं आश्वासनही दिलं होतं” असं युजवेंद्र चहलने क्रीडा पत्रकार रवीश बिष्ट यांच्याशी बोलताना सांगितलं.

“आयपीएल रिटेंशनच्यावेळी मी आरसीबी कडे एकही पैसा मागितला नव्हता. युजवेंद्र चहलने 10 ते 12 कोटी रुपयांची मागणी केली, असं बोललं जातं. पण यात अजिबात तथ्य नाहीय. मला माइक हेसन यांचा फोन आला होता व त्यांनी रिटेन केलेल्या तीन खेळाडूंची नाव मला सांगितली. ऑक्शनमध्ये माझ्यावर बोली लावणार असही त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं. दोन नव्या टीम्ससाठी ड्राफ्ट खेळाडू म्हणून मी जाईन अशी त्यांना भिती होती. पण मी त्या संघांकडून खेळणार नाही, असं त्यांना आश्वासन दिलं होतं. मला 100 टक्के आरसीबीकडूनच खेळायचं होतं” असं युजवेंद्र चहलने सांगितलं.

“सोशल मीडियावर मला ट्रोल करण्यात आलं. मला शिव्या घातल्या. आरसीबीने युजवेंद्र चहलला इतक सगळं दिलं पण त्याला रिटेन व्हायच नाहीय असं सगळेजण म्हणत होते. पण सत्य हे आहे की, मला आरसीबीने काही सांगितलचं नाही. त्यांनी फक्त मला रिटेन केलेल्या तीन खेळाडूंची नाव सांगितली आणि ऑक्शनमध्ये खरेदी करण्याचं आश्वासन दिलं” अशी माहिती चहलने दिली.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here