आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

२७ लाखांच्या बिर्याणीची धास्तीने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने निवडला स्वस्तातला डाळ-रोटीचा पर्याय!


ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. रावळपिंडीच्या मैदानातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर दोन्ही संघ कराचीच्या मैदानात एकमेकांविरुद्ध उतरणार आहेत. १२ मार्च पासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी जलदगती गोलंदाज जोश हेजलवूडच्या जागी लेग स्पिनर मिचेल स्वेपसनला संघात सामील करुन घेण्यात आले आहे.

रावळपिंडीतील पहिल्या कसोटीत मार्नस लाबुशेन याने दमदार खेळी केली होती. त्याचे शतक अवघ्या १० धावांनी हुकले होते. दुसऱ्या सामन्यापूर्वी तो चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला. पाकिस्तानमध्ये लंचवेळी डाळ रोटी खाल्ली. ती स्वादिष्टही आहे.

त्याच्या या फोटोवर भारतीय संघाचा माजी क्रिकेटर वसीम जाफरनं प्रतिक्रिया दिलीये. डाळ आणि रोटी पेक्षा डाळ आणि भात हे कॉम्बिनेशेन भारी असते, असे म्हणत त्याने मार्नस लाबुशेनची गंमत केलीये. भारतीय संघाचा माजी फलंदाजाने याआधी रावळपिंडीच्या खेळपट्टीवरुन पाकिस्तानची शाळा घेतली होती. त्यानंतर आता मार्नस लाबुशेनच्या फोटोवर प्रतिक्रिया देऊन त्याने पाकिस्तान खेळाडूंना हेल्दी लंच देत नाही, असा टोलाच मारल्याचे दिसते.

याआधी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. हा दौरा बिर्याणी आणि सुरक्षा या दोन कारणामुळे चर्चेत आला होता. न्यूझीलंडच्या संघाने सुरक्षिततेच्या कारणास्त्व पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार देऊन मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड दौरा रद्द झाल्यानंतर या दौऱ्यावर न्यूझीलंड संघाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी बिर्याणीवर ताव मारला होता. २७ लाख रुपयांचं बिर्याणी बिल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आलं होते. याची खूप चर्चाही रंगली होती. आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मात्र डाळ रोटीवर समाधान मानावे लागत असल्याचे दिसते.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here