आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

फक्त १४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारा खेळाडू आला प्रकाशझोतात!


आयपीएलचा लिलाव संपला आहे. पण त्यानंतरही एका खेळाडूला आयपीएलध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे. या खेळाडूने फक्त १४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर हा खेळाडू प्रकाशझोतात आला आणि आता तर त्यासाठी आयपीएलचे दार खुले करण्यात आले आहे. हा खेळाडू नेमका आहे तरी कोण आणि लिलिवानंतरही त्याला कोणत्या संघाने आपल्या ताफ्यात सामील केले आहे.

फक्त १४ चेंडूंमध्ये एका खेळाडूने चक्क अर्धशतक झळकावलं. त्यानंतर तो प्रकाशझोतात आला आणि आता तर लिलाव झाल्यानंतरही त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे. या खेळाडूला लिलावानंतरही कशी आयपीएल खेळण्याची संधी देण्यात आली, हा प्रश्न चाहत्यांना पडेलला आहे. त्याचबरोबर हा खेळाडू नेमका आहे तरी कोण आणि तो आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळणार आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला, जेव्हा त्यांचा सलामीवीर जेसन रॉयने स्पर्धेतून अचानक माघार घेतली. आता ही कमी गुजरात टायटन्सने भरून काढली आहे. जेसन रॉयच्या जागी गुजरात टायटन्सने नव्या खेळाडूचा समावेश केला आहे. अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक रहमानुल्लाह गुरबाजला गुजरातने आपल्या संघात सामील केले आहे. गुरबाज हा सलामीवीर खेळाडू असून तो त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठीही ओळखला जातो.

रहमानुल्लाह गुरबाजने गेल्या वर्षी टी-१० लीगमध्ये फक्त १४ चेंडूत अर्धशतक ठोकून खळबळ उडवून दिली होती. दिल्ली बुल्सकडून खेळताना गुरबाजने १६ चेंडूत ५७ धावा केल्या होत्या. गुरबाजच्या कारकीर्दीवर नजर टाकली तर त्याने ६९ टी-२० सामन्यांमध्ये १६२० धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १५० पेक्षा जास्त आहे.

तसेच गुरबाज मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्येही एक चांगला फलंदाज आहे. अफगाणिस्तानसाठी ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ५० पेक्षा जास्त सरासरीने ४२८ धावा केल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे त्याने ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ शतके झळकावली आहेत. २० वर्षीय रहमानुल्लाह गुरबाजने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहेत. ज्यामध्ये आयपीएल करार मिळाल्यानंतर त्याने आभार मानले आहेत, पण तो कोणत्या संघातून खेळणार हे त्याने गुपित ठेवले आहे, पण त्याला जेसन रॉयच्या जागी गुजरात टायटन्सने करारबद्ध केले आहे, अशी सगळीकडे चर्चा आहे. पण याबाबत अधिकृत माहिती गुजरातच्या संघाने दिलेली नाही. त्यामुळे आता गुजरातचा संघ याबाबत कधी स्पष्ट भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here