आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

एकाच सामन्यात दोन शतकवीर; सामनावीराचा पुरस्कार शेअर करत स्म्रितीने दाखवले महाराष्ट्राचे संस्कार!


भारतीय महिला संघाने विश्वचषकात बलाढ्य वेस्ट इंडिज संघावर मोठा विजय मिळवला. गतविजेत्या इंग्लंड व यजमान न्यूझीलंडला पराभूत करणाऱ्या वेस्ट इंडिजचा विजयरथ भारतीय महिलांनी रोखला. आजच्या लढतीत भारताच्या ३१८ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ १६२ धावांवर माघारी परतला. भारताने १५५ धावांनी हा सामना जिंकून आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

स्मृती मानधनाच्या १२३ आणि हरमनप्रीर कौरच्या १०९ धावांच्या खेळीनंतर स्नेह राणा ( ३-२२), मेघना सिंग ( २-२७) आणि झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड व पूजा वस्त्राकर यांच्या प्रत्येकी १ विकेट्सने हा विजय मिळवून दिला. महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक ४० विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी झुलन गोस्वानीने नावावर केली. आहे. न्यूझीलंडमध्ये झुलनने सर्वाधिक २४ विकेट्स घेताना नीतू डेव्हिडचा २३ विकेट्सचा विक्रम मोडला. या सामन्यात स्मृती मानधनाला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, परंतु तिने हा सामनावीराचा पुरस्कार हरमनप्रीत कौरसोबत संयुक्तपणे स्वीकारली.

प्रथम फलंदाजी करताना भारताला स्मृती व यास्तिका भाटीया यांनी ४९ धावांची सलामी दिली. भाटीया ३१ धावांवर बाद झाल्यानंतर भारताच्या तीन विकेट्स धडाधड पडल्या. कर्णधार मिताली राज ( ५), दीप्ती शर्मा ( १५) हे माघारी परतल्यामुळे भारताची अवस्था ३ बाद ७८ अशी झाली. त्यानंतर स्मृती व हरमनप्रीत यांनी १८४ धावांची विक्रमी भागीदारी केली. भारताकडून विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम भागीदारी ठरली याआधी पूनम राऊत आणि थिरूष कामिनी यांनी २०१२ साली १७५ धावांची भागीदारी केली होती. महिला वनडे सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येताना शतक झळकावणारी हरमनप्रीत कौर ही पहिली भारतीय महिला ठरली. यापूर्वी रूमेली धार हिने २००८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध नाबाद ९२ धावा केल्या होत्या.

वेस्ट इंडिजच्या डिएंड्रा डॉटीन व हायली मॅथ्यूज यांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावा जोडल्या. पण, पुढील ६२ धावांत त्यांचा संपूर्ण संघ माघारी परतला. डॉटीनने ६२, तर मॅथ्यूजने ४३ धावा केल्या.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here