आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आता कोलकाताच्या संघाकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूनं केला अजब रेकॉर्ड चक्क ९ संघातून खेळलाय हा क्रिकेटपटू!


चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, लखनऊ यापैकी गुजरात टायटन्स आणि लखनऊ हे नवे दोन संघ पहिल्यांदाच २०२२ मध्ये आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उतरणार आहेत. चेन्नईनं आतापर्यंत ४ वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

आयपीएल २०२२ चे सामने अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. तयारीही सुरू झाली आहे. यंदा १० संघात ७० सामने खेळवण्यात येणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक जोड्या फुटल्या आहेत. अनेकांचे संघ बदलले आहेत. त्यामुळे यंदाची आयपीएल अधिक चुरशीची होणार आहे. या आयपीएलमध्ये कोलकाताच्या क्रिकेटपटूनं अजब रेकॉर्ड केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या लिमिटेड ऑव्हर्सचा कर्णधार एरोन फिंचसाठी एक मोठी बातमी आहे. आयपीएलमध्ये तो यावर्षी कोलकाता संघाकडून खेळताना दिसणार आहे. एकूणच आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामात तो ९  संघाकडून खेळला आहे. ९ संघांमधून खेळणारा एरोन पहिला खेळाडू बनला आहे. त्याच्या नावावर हा अजब रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे.

फिंचची ९ वा कोलकाता संघ असणार आहे. यापूर्वी तो दिल्ली, गुजरात लॉयन्स, पंजाब टीम, मुंबई इंडियंस, पुणे वॉरियर्स, राजस्थान रॉयल्स, बंगलुरु आणि सनराइजर्स हैदराबाद संघामध्ये खेळला आहे.

३ तीन संघांमध्ये फिंचला खेळण्याची संधी मिळाली नाही

चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, लखनऊ यापैकी गुजरात टायटन्स आणि लखनऊ या नव्या दोन टीम पहिल्यांदाच २०२२ मध्ये आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उतरणार आहेत. चेन्नईनं आतापर्यंत ४ वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

फिंच आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ मध्ये अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर कोलकाताच्या संघातील एलेक्स हेल्सनं माघार घेतल्यानं त्याच्या जागेवर फिंचला घेण्यात आलं. त्याने एकूण ८७ सामने खेळले आहेत.

आयपीएलची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. २९ मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना CSK विरुद्ध KKR होणार आहे. चेन्नईचा कर्णधार धोनी तर कोलकाता संघाचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे असणार आहे.

आयपीएल २०२२ मध्ये अॅरॉन फिंच वर्षभरानंतर परतला आहे. लीगच्या आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सच्या जागी ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार फिंचचा दोन वेळचा चॅम्पियन केकेआर संघात समावेश करण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने हेल्सला लिलावात १.५० कोटी रुपयांना विकत घेतले आणि फिंचलाही हेल्सच्या बरोबरीने १.५० कोटी रुपये मिळतील. फिंचला गेल्या हंगामात खेळण्याची संधी मिळाली नाही आणि या वर्षीही तो आयपीएल २०२२ मेगा लिलावात न विकला गेला.

फिंचने आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकून दिला होता. त्याने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत ८८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २६८६ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर दोन शतके आणि १५ अर्धशतके आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघ हा आयपीएलमधील नववा संघ असेल ज्यांच्यासोबत फिंच खेळणार आहे. याआधी तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, पुणे वॉरियर्स, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे.

कोलकाता नाइट रायडर्स ने टाटा इंडियन प्रीमियर लीग २०२२ साठी इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्सच्या जागी अॅरॉन फिंचला करारबद्ध केले आहे, असे BCCI ने एका निवेदनात म्हटले आहे. हेल्सने स्पर्धेतून माघार घेण्याचे कारण म्हणून बायो बबल थकवा नमूद केला. फिंचच्या नावावर ८७ IPL सामन्यात २००० पेक्षा जास्त धावा आहेत.

त्याला दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता १.५० कोटी रुपयांमध्ये सामील करेल. आयपीएल २०२२ मध्ये, कोलकाताला गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध २६ मार्च रोजी पहिला सामना खेळायचा आहे. ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान दौऱ्यावर असल्याने फिंचलाही आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.

केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांचे विधान

वेंकी म्हैसूर, सीईओ, कोलकाता नाइट रायडर्स म्हणाले, “आम्ही अॅलेक्स हेल्सच्या आगामी आयपीएल हंगामातील सहभागाबद्दल कुटुंब आणि मानसिक आरोग्य निवडण्याच्या निर्णयाचा आदर करतो. आम्ही त्यांना आमच्या शुभेच्छा देतो. टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार अॅरॉन फिंचचे नाइट रायडर्स कुटुंबात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. तो मुंबईतील उर्वरित केकेआर संघात सामील होण्यास उत्सुक आहे आणि त्याच्या अफाट अनुभवाचा फायदा घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here