आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सहा चेंडूवर सहा षटकार खेचनाऱ्या खेळाडूची ही हेअरस्टाईल सध्या प्रचंड गाजतेय!


भारतीय संघाचे खेळाडू जितके त्यांच्या खेळासाठी ओळखले जातात तितकेच फॅशन जगतातही त्यांचे वर्चस्व आहे. भारतीय संघातील फॅशन किंवा हेअरस्टाईलचा विचार केला तर आजच्या काळात भारतीय संघाच्या खेळाडूंची एकापेक्षा एक हेअरस्टाईल आहे. पण भारतीय संघाचा युवराज सिंग हा मैदानाबाहेर त्याच्या स्टाईल आणि मस्ती साठी ओळखला जातो. युवराजने भारतीय संघामध्ये फॅशनला नव्या उंचीवर नेले आहे. युवराज सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याच्या नवीन लूकने त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.

https://www.instagram.com/reel/Ca7G5ZRDsiD/?utm_source=ig_web_button_share_sheet

युवराज सिंगने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. चाहतेही हा व्हिडिओ सतत शेअर करताना दिसत आहे. युवराजने या व्हिडिओमध्ये केसांची नवीन स्टाइल शेअर केली आहे. क्लिपमध्ये पूर्णपणे आपला स्वॅग दाखवला आहे. लाल टी-शर्ट आणि काळा चष्मा घातलेल्या युवराजची ही स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. हेअरस्टाईल लूकमध्ये युवराज मोठ्या केसांमध्ये दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CakClYDAF-8/?utm_source=ig_web_button_share_sheet

युवराज सिंगने १ मार्चला इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. व्हिडिओमध्ये युवराज त्याची आई शबनम सिंगची प्रँक करताना दिसत आहे. युवराज सिंगने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पुन्हा एकदा आईसोबत प्रँक.’ त्याने हा व्हिडिओ आईच्या इन्स्टाग्रामवरही टॅग केला आहे. त्याचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

युवराजचे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान होते. २००७ टी-20 विश्वचषक आणि २०११ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयाचा तो सर्वात मोठा हिरो होता. युवराजने भारतासाठी ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २०११ च्या विश्वचषकात युवराज मालिकावीर देखील होता. युवराज सिंगने २०१९ मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here