आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
कसोटीच्या पहिल्याच दिवशी रोहित शर्माने मोडले प्रेक्षकाचे नाक, गंभीर दुखापतीमुळे व्हावं लागल हॉस्पिटलमध्ये भर्ती..
क्रिकेटच्या मैदानात अनेकदा काही विचित्र घटना घडतच असतात.असाच काहीसा विचित्र प्रकार घडलाय. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बेंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यादरम्यान. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मारलेल्या षटकारामुळेएका प्रेक्षकाच्या नाकाला दुखापत झालीय.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील बंगळुरू कसोटी सामना शनिवारपासून सुरू झालाय. दिवस-रात्रीच्या सामन्यामुळे प्रेक्षकांना पूर्ण क्षमतेने स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. प्रत्येकजण आपापल्या आवडत्या क्रिकेट पाहण्यासाठी आला होता.

मात्र, यादरम्यान रोहित शर्माच्या चेंडूचा फटका मैदानाबाहेर बसलेल्या एका प्रेक्षकाला लागला. विश्व फर्नांडोच्या चेंडूवर रोहित शर्माने जबरदस्त षटकार ठोकला आणि तो थेट प्रेक्षक गॅलरीत खोल कॉर्पोरेट बॉक्समध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्या नाकाला चेंडू लागला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा एक्स-रे काढण्यात आला. त्यानंतर त्याचे नाक फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले. रोहित शर्माने 15 धावांच्या खेळीत केवळ एक षटकार मारला आणि त्यामुळे प्रेक्षकांचे नाक मोडले.
बंगळुरू कसोटी सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ 252 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 6 बाद 86 धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे श्रीलंका सध्या भारतापेक्षा 166 धावांनी मागे आहे. आता श्रीलंका संघ आपली धावसंख्या किती पुढे नेतो हे पाहायचे आहे. संघाच्या फारशा विकेट्स शिल्लक नाहीत.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?
कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!