आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
हा तीन फुटाचा घोडा कोणी पहिला आहे का?, पाहा ‘या’ खेळाडूच्या घोड्याची ही खास गोष्ट!
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते जगभर आहेत. त्याचं भारतीय क्रिकेटमधील योगदान अतुलणीय आहे. धोनी जितका त्याच्या खेळासाठी ओळखला जातो, तितकाच त्याचं वैयक्तिक जीवनही चर्चेत असते. धोनीला पाळीव प्राण्यांचीही आवड आहे. त्याच्याकडे एका खास जातीचा घोडा आहे. धोनीचं अलिशान फार्महाऊस काही एकरांमध्ये पसरलं आहे. धोनीचं हे फार्महाऊस एखाद्या महालापेक्षा कमी नाही. धोनीला पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. त्याच्या फार्महाऊसमध्ये श्वानांव्यतिरिक्त खूप पक्षीही आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या फार्म हाऊसमध्ये चेतकनंतर आणखी एक घोड्याची एन्ट्री झाली आहे. शेटलंड पोनी जातीचा हा घोडा बुधवारी स्कॉटलंडहून रांची येथे आला. यानंतर हा घोडा सिमलियातील धोनीच्या निवासस्थानी पोहोचला. २ वर्षाचा हा घोडा जगातील सर्वात लहान जातींपैकी एक आहे. त्याची उंची फक्त ३ फूट आहे. हा घोडा वेगासाठी नव्हे, तर केवळ सजावट आणि शोसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत खूप जास्त आहे.
धोनीकडे लाखो रुपये किंमतीचा एक घोडाही आहे. परंतु हा घोडा इतर घोड्यांसारखा नाही. धोनीकडे स्कॉटलँडमधील शेटलँड पोनी जातीचा घोडा आहे. या घोड्याचं वैशिष्ट्य म्हणजे या घोड्याची उंची जास्त नसते. या घोड्याची जास्तीक जास्त उंची तीन फूटांपर्यंत असते. हा घोडा पळण्याच्या बाबतीतही इतर घोड्यांच्या खूप पाठीमागे राहतो. या जातीचा घोडा फक्त शोसाठी ओळखला जातो. लोक त्याला फक्त हौस म्हणून खरेदी करतात.
धोनीकडे असलेल्या घोड्याचा रंग पांढरा आहे. धोनीकडे यापूर्वी काळ्या रंगाचा घोडा होता. हा घोडा मारवाडी प्रकारचा होता. या घोड्याचं नाव चेतक असं होते. धोनी आपल्या ४६एकर पसरलेल्या फार्म हाऊसमध्ये सेंद्रिय शेती तसेच गोपलनही करतो. त्याच्याकडे १०० पेक्षा जास्त गायी आहेत. इंडिगो पेंटवाला घोडा आहे. घोड्यासोबत धोनीचा फोटो व्हायरल झाला आहे.
धोनीने त्याच्या मुलीला झिवाला गिफ्टमध्ये घोड्याचं पिल्लू दिलं आहे. फोटोमध्ये दिसणारं हे तेच पिल्लू आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईनं आयपीएलचं १४ पर्वं जिंकलं आहे. धोनींनं संघाला मोठ यश मिळवून दिलेलं आहे. त्यामुळं चेन्नईला धोनीला रिटेन करण्याशिवाय पर्याय नाही असं दिसतंय.
भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियावर फार सक्रिय नसतो. त्यामुळे मोकळ्या वेळेत धोनीचं काय चाललय? हे त्याच्या चाहत्यांना कळत नाही. अजून आयपीएल सुरु झालेलं नसल्यामुळे धोनी सध्या निवांत आहे. रविवारी धोनीच्या फॅन्सना त्याची एक झलक पाहायला मिळाली. धोनी घोड्याच्या पिल्लाला काहीतरी खाऊ घालत असल्याचा फोटो चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोवर ‘लव्ह यू माही’सह अनेक कमेंट आल्या आहेत. एका युजरने इंडिगो पेंटवाला घोडा आहे का? असा प्रश्न विचारला आहे.
धोनीने त्याच्या मुलीला झिवाला गिफ्टमध्ये घोड्याचं पिल्लू दिलं आहे. फोटोमध्ये दिसणारं हे तेच पिल्लू आहे. धोनीला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. धोनीने अनेक श्वान पाळले आहेत. साक्षी धोनी जेव्हा फोटो पोस्ट करते, तेव्हा हे प्राणी त्यामध्ये दिसतात. धोनीने स्वत:लाच एक घोडा गिफ्ट केला आहे. त्याला त्याने चेतक नाव दिले आहे. काही आठवड्यांनी हे पिल्लू धोनीच्या घरी आले.
सीएसकेचा कर्णधार धोनी सध्या रांचीमध्ये आहे. आयपीएल २०२२ मध्ये धोनी आता आपल्याला दिसेल. सीएसकेने धोनीला आपल्याकडे कायम ठेवले आहे. पाचवे विजेतेपद मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. १५ ऑगस्ट २०२० रोजी धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. मागच्यावर्षी त्याच्या नेतृत्वाखाली CSK ने चौथे जेतेपद पटकावले आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये धोनीचा टीम इंडियाचा मार्गदर्शकही होता.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.