आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दिलेल्या जेवणावरून हा नवा वाद सुरू झालाय


पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कराची येथे दुसरी कसोटी सुरू आहे. या कसोटीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दिलेल्या जेवणावरून नवा वाद सुरू झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ २४ वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला आहे. दोन्ही संघात रावळपिंडी येथे झालेली पहिली कसोटी ड्रॉ झाली. रावळपिंडी कसोटीत दोन्ही संघांनी १ हजारहून अधिक धावा केल्या होत्या. त्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका देखील झाली होती. आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना दिल्या जाणाऱ्या जेवणावरून वाद समोर आलाय.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी कसोटी कराची येथे सुरू झाली आहे. या कसोटीच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या लंच मेन्यूमध्ये दाल-रोटीचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन याने सोशल मीडियावर दाल-रोटीचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, लंचसाठी दाल-रोटी… किती चविष्ट आहे. लाबुशेनने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डला ट्रोल केले जाऊ लागले.

भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफर याने देखील लाबुशेनच्या पोस्टवर एक मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. जाफर याने लाबुशनेला त्याच्या प्रतिक्रिये द्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, दाल-रोटी किती फायद्याची आहे. अन्य एका युझरने लाबुशेनच्या यापुढे कधीच मेसमधील जेवणावर टीका करणार नाही.

पहिल्या कसोटीत दोन्ही संघांनी मिळून १ हजार १८७ धावा केल्या होत्या आणि फक्त १४ विकेट पडल्या. या सामन्यासाठी खेळपट्टी फलंदाजीचा विचार करून तयार करण्यात आली होती. सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंन्सने टीका केली होती.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here