आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

तुम्हाला काय वाटते, सामना सुरु असताना विराट सोडून कर्णधार रोहित कोणत्या खेळाडूचे ऐकतो?


भारतीय संघामध्ये असा एक खेळाडू आहे, ज्यावर रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा अधिक विश्वास दाखवतोय. रोहित शर्माची टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. तेव्हापासून टीम इंडियाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

रोहितने टीममध्ये ज्या युवा खेळाडूंना संधी दिली ते सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. रोहितला युवा खेळाडूंसह माजी कर्णधार विराट कोहलीचाही पूर्ण पाठिंबा मिळत आहे. मात्र रोहित विराटऐवजी टीममधल्या दुसऱ्याच खेळाडूचं सर्वकाही ऐकतोय.

रोहितला विराटच्या कर्णधारपदाच्या अनुभवाचा फायदा होत आहे. पण संघामध्ये असा एक खेळाडू आहे, ज्यावर रोहित विराटपेक्षा अधिक विश्वास दाखवतोय. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रिषभ पंत आहे. विशेष म्हणजे पंतचं ऐकणं हे रोहितसाठी फायदेशीर ठरतंय.

पंत बॅटिंगने धमाकेदार कामगिरी करतोयत. सोबतच तो यष्टीरक्षण करताना स्टंपमागून धमाका करतोय. डीआआरएस घेण्याचासाठी रोहितकडे कधी तगादा लावायचा आणि कधी नाही, हे पंतला आता चांगलंच जमतंय.

कर्णधार रोहितचा डीआरएस घेण्याचा निर्णय हा बहुतांश वेळा पंतचा असतो. विशेष म्हणजे पंतने जेव्हा जेव्हा डीआरएस घेण्यास सांगितलाय, तेव्हा तेव्हा फलंदाज हा आऊट झालेलाय. श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतच याची प्रचिती आली. त्याचं झालं असं की, श्रीलंकाच्या पहिल्या डावातील १२ वी ओव्हर ही मोहम्मद शमी टाकत होता. शमीने या षटका दरम्यान टाकलेला एक चेंडू हा फलंदाजाच्या पॅडवर जाऊन लागला.

शमीने एलबीडबल्यूसाठी अपील केली. मात्र ती अपील अंपायरने नाकारली. मग काय पंतने रोहितला डीआरएस घेण्यासाठी सांगितलं. रोहितनेही डीआरएस घेतला. अन् काय बॅट्समन आऊट होता आऊट. त्यामुळे पंतच्या हुशारीने भारतीय संघाला मोठी विकेट मिळवून दिली.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here