आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आयपीएल 2022 ची रणधुमाळी आजपासून सुरु, हे दोन संघ भिडतील पहिल्या सामन्यात, पहा कोण कोण असणार खेळाडू!


क्रिकेट चाहत्यांची दिवाळी अर्थात आयपीएल 2022 आजपासून सुरु  होत आहे. गेल्या हंगामातील अंतिम सामना खेळणारे दोन संघ चेन्नई आणि कोलकत्ता या हंगामाचा सुरवातीचा सामना खेळणार आहे.

भारतीय क्रिकेटला भरघोस किंमत आणि नवी ओळख देणारे आयपीएल 10 संघांसह घरबसल्या आपला रंग उधळण्यासाठी सज्ज झाले आहे. आज गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गतवर्षीचा उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना होईल. 2011 नंतर प्रथमच ट्रॉफीसाठी 10 संघ भिडतील. यावेळी लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्सच्या रूपाने दोन नवीन संघ आयपीएलमध्ये पदार्पण करतील.

आयपीएल

दिग्गज महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलमधील हा शेवटचा हंगाम असू शकतो. पहिल्या सामन्यापूर्वी त्याने कर्णधारपद सोडले आणि जडेजाकडे कमान सोपवली. सर्वांच्या नजरा जडेजावर असतील कारण त्याला अशा संघाचे नेतृत्व करायचे आहे ज्याचे नेतृत्व धोनी 2008 पासून करत आहे जो चार वेळा चॅम्पियन आहे.

यावेळी श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या आणि मयंक अग्रवाल यांच्या नेतृत्व कौशल्याचीही चाचणी घेतली जाईल. अय्यर केकेआरचे नेतृत्व करतील तर राहुल लखनऊ आणि हार्दिक गुजरातचे नेतृत्व सांभाळतील. अग्रवालला पंजाबचा कर्णधार बनवण्यात आले आहे. अय्यरने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे तर राहुलने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आहे. हार्दिकसाठी आयपीएलमधील कर्णधारपदाचा हा पहिलाच अनुभव असेल.

तर यंदाच्या या आयपीएल  हंगामात कोणता संघ  वरचड ठरेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.


=

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here