आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात 5 षटकार आणि 3चौकार ठोकणारा युवा खेळाडू टिळक वर्मा आहे तरी कोण?


आयपीएल 2022 च्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 23 धावांनी पराभव केला.या संपूर्ण सामन्यानंतर मात्र चर्चा झाली ती एकाच खेळाडूची तो म्हणजे मुंबईचा युवा फलंदाज तिलक वर्मा.

या युवा फलंदाजाने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने 33 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 61 धावांची शानदार खेळी खेळली.हैदराबादच्या या 19 वर्षीय युवा फलंदाजाचा मुंबई इंडियन्सने 1.7 कोटी रुपयांना आपल्या संघात समावेश केला होता. त्याची मूळ किंमत 20 लाख होती.

 तिलक वर्मा

कोण आहे तिलक वर्मा?

तिलक वर्माने 2020 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता.वर्माने 2021-2022 मध्ये या वर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 147.26 च्या स्ट्राइक रेटने 215 धावा केल्या.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपला फॉर्म कायम राखत त्याने 97.75 च्या सरासरीने 391 धावा केल्या. याच कारणामुळे मुंबईने त्यांचा संघात समावेश केला.………………………………………………………………………………………………….

हेही वाचा:

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

या 3 भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत विश्व चषक स्पर्धेतील ‘गोल्डन बॅट’ जिंकलीय..!

…………………………………………………………………………………………………………

 तिलक वर्माच्या लिस्ट ए कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत 16 सामने खेळले आहेत.

 तिलक वर्मा

यादरम्यान त्याने 52.26 च्या सरासरीने 784 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने 3 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत.त्याच वेळी, त्याने आतापर्यंत 16 टी-20 सामने खेळले आहेत आणि 143.92 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटच्या मदतीने त्याच्या खात्यात 403 धावा जमा केल्या आहेत.

यादरम्यान त्याने ३ अर्धशतके झळकावली आहेत. मोठे फटके खेळून सामना फिरवण्याची क्षमता टिळकांकडे आहे.

याशिवाय, उजव्या हाताच्या फलंदाजाने 4 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 31.87 च्या सरासरीने 255 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत. तिलक वर्माच्या कारकिर्दीत प्रशिक्षक सलाम बायश यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी टिळकांना त्यांच्या घरात राहण्यासाठी जागा दिली.

वडील नंबुरी नागराजू गरीब असल्याने त्यांना अकादमीत पाठवणे परवडणारे नव्हते.

त्यामुळे त्याचा सर्व खर्च प्रशिक्षक सलाम यांनी केला. आपल्या प्रशिक्षकाबद्दल टिळक एका मुलाखतीत म्हणाले होते की, “माझ्याबद्दल जरी लिहिलं नसलं तरी प्रशिक्षक सरांबद्दल अवश्य लिहा. अतिशय गरीब परिस्थितीतून आलेल्या या खेळाडूला प्रशिक्षकाच्या अनमोल साथीमुळे आज संपूर्ण जगभर चमकण्याची संधी मिळालीय ती केवळ आयपीएल मुळेच.


=

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here