आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

Happy Birthday Allu Arjun. अल्लू अर्जुन असा बनला आयकॉन स्टार , आज साउथ इंडस्ट्रीवर करतोय राज


पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुनचा वाढदिवस ८ एप्रिल रोजी आहे. वयाच्या अवघ्या दोनव्या वर्षी त्यांनी 1985 मध्ये आलेल्या विजेता चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले. 2001 मध्ये आलेल्या डॅडी चित्रपटात त्याने कॅमिओ केला होता. 2003 साली ‘गंगोत्री’ मधून त्याने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. ‘आर्य’ चित्रपटातून अर्त्याजुनला   सर्वात मोठा ब्रेक मिळाला.

अल्लू अर्जुन (Allu Arjun) फॉलोअर्सच्या बाबतीत अगदी बॉलीवूड स्टार्सशीही स्पर्धा करतो. अल्लू अर्जुन दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय चित्रपट कुटुंबातील आहे. अल्लू अर्जुनचे आजोबा अल्लू रामलिंगय्या हे लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी एक हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर अल्लू अर्जुन (Allu Arjun) चे वडील अल्लू अरविंद हे दक्षिणेतील सर्वात प्रसिद्ध निर्माते आहेत. अल्लू अरविंद अनेक सुपरहिट आणि ब्लॉक बस्टर चित्रपटांचे निर्माते आहेत. अल्लू अर्जनला अल्लू शिरीष नावाचा भाऊ आहे, जो एक अभिनेता आहे. अल्लू शिरीषने गौरवम या चित्रपटातून पदार्पण केले.

Allu Arjun

अल्लू शिरीष व्यतिरिक्त अल्लू अर्जुनला आणखी एक भाऊ आहे, त्याचे नाव अल्लू व्यंकटेश आहे. उल्लेखनीय आहे की अल्लू अर्जुन आणि राम चरण हे नात्यातील चुलत भाऊ आहेत. राम चरणचे वडील चिरंजीवी अल्लू अर्जुनचे काका आहेत.

चिरंजीवीशिवाय पवन कल्याण अल्लू अर्जुनचा काकाही आहे. याशिवाय नागेंद्र बाबू हे चिरंजीवीचे भाऊ आहेत. नागेंद्र बाबू यांची दोन मुले वरुण तेज आणि निहारिका कोनिडेला देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुन निहारिका आणि वरुण तेज यांचा नातेवाईकही आहे.

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि स्नेहा यांच्या लग्नाला 10 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या जोडप्याला आरा आणि अयान ही दोन मुले आहेत. अल्लू अर्जुनलाही सामाजिक कार्यात रस आहे आणि त्यामुळेच तो वाढदिवसाला रक्तदान करतो.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here