आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

धोनी सलामीला फलंदाजीला आला तर बदलू शकते चेन्नईची किस्मत, या माजी खेळाडूने व्यक्त केली भविष्यवाणी…


आयपीएल 2022 मध्ये सलग चार पराभवांची चव चाखणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाची आयपीएल 2022 ची सुरुवात खूपच खराब झाली आहे. आयपीएल 2022 मध्ये सुपर किंगला सलग चार सामन्यांत पराभवाची चव चाखावी लागली आहे. जिथे चार वेळचा चॅम्पियन संघ आणि 9 वेळा अंतिम फेरीत दाखल झालेला चेन्नई सुपर किंगला हा पराभव पचवणे खूप कठीण काम आहे. जडेजावर कर्णधारपदाचा भार आणि दडपण स्पष्टपणे दिसत आहे.

सलग चार पराभवानंतर चेन्नई सुपर किंगला कोणत्या विभागात सुधारणा करण्याची गरज आहे हे समजणे फार कठीण आहे जेणेकरून संघ पुन्हा विजयी मार्गावर येईल.फलंदाज पार्थिव पटेलने चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल सुचवला आहे. महेंद्रसिंग धोनीने सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी असं सुचवलं आहे.

महेंद्रसिंग धोनी

पार्थिव पटेलने ट्विट केले की, “धोनीचे तंत्र कोणत्याही सलामीवीरासाठी कॉपी बुकसारखे असू शकत नाही, परंतु त्याच्या स्वत:च्या पद्धती आहेत की तो खडतर परिस्थितीत कसा टिकून राहतो आणि नंतर मोठी धावसंख्या करतो. त्याने असेही लिहिले की सीएसकेसाठी धोनीला सलामीवीर म्हणून वापरण्याची ही चांगली वेळ नाही? तुम्हाला काय वाटत?

…………………………………………………………………………………………………

हेही वाचा:

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

या 3 भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत विश्व चषक स्पर्धेतील ‘गोल्डन बॅट’ जिंकलीय..!

…………………………………………………………………………………………………………

क्रिकबझशी संभाषणादरम्यान, पार्थिव पटेलने असेही सांगितले की, पाकिस्तानविरुद्ध धोनीने भारताची सुरुवातीची विकेट पडल्यानंतर चमकदार कामगिरी केली आणि शतकही केले. त्याला त्याच्या तंत्राने फलंदाजी कशी करायची हे माहीत आहे.

धोनी सक्षम आहे. हे सुद्धा विचार करण्यासारखे असेल. 4 सामने हरल्यानंतर धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येतो आणि धोनीच्या फलंदाजीच्या क्रमातील बदल चेन्नई सुपर किंग्जचे नशीब बदलतात की नाही हे पाहणे खूप मनोरंजक असेल. तेच चार सामने गमावल्यानंतर सकारात्मक विचार करून मैदानावर पुन्हा विजयाच्या इराद्याने खेळायचे आहे, असेही जडेजाने सांगितले.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here