आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा “KGF CHAPTER 2” ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?,. या दिवशी होणार या ठिकाणी प्रदर्शित.


एखाद्या  चित्रपटाच्या बाबतीत कधी कधी चाहते खूपच उत्सुक असतात. यामागे त्या अभिनेत्यावरील लोकांचे प्रेम, अभिनेत्याची क्रेझ तसेच इतर गोष्टीही अवलंबून असतात. सध्या अश्याच एका चित्रपटाची चर्चा जोरदार सुरुय. तब्बल 4वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर ‘गरुडाला मारल्यानंतर केजीएफमध्ये काय झाले? या प्रश्नाचे उत्तर लोकांना मिळण्यास सुरु झालं आहे.

दाक्षिणात्या अभिनेता यशचा (Yash) ‘केजीएफ 2′(KGF 2) सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अनेक बिग बजेट सिनेमांचे रेकॉर्ड या सिनेमाने मोडले आहेत. रिपोर्टनुसार, ‘केजीएफ 2’ हा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?

 

यशच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यशचा बहुचर्चित ‘केजीएफ 2’ सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ‘केजीएफ’ सिनेमाचा पहिला भाग याआधीच अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. आता केजीएफचा दुसरा भागदेखील अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरच प्रदर्शित होणार आहे.

ओटीटीसह ‘केजीएफ 2’ सिनेमा छोट्या पडद्यावरदेखील दाखवला जाणार आहे. ‘केजीएफ 2’ सिनेमाची ओटीटी रिलीज डेट अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. प्रेक्षक गेले अनेक दिवस या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

‘केजीएफ 2’ सिनेमाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाने जगभरात 250 कोटींची कमाई केली होती.  ‘केजीएफ 2’ सिनेमाने पहिल्या दिवशी हिंदी वर्जनमध्ये 53.95 कोटींची कमाई केली आहे.  तर जगभरात केजीएफ 2ने पहिल्या दिवशी 135 करोडची बंपर कमाई केलीय.


=

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here