आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

MIvsLSG: के. एल.राहुल चा अनोखा विक्रम,आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा ठरला एकमेव खेळाडू!


आयपीएल २०२२ च्या आजच्या डबल हेडर सामन्यातील पहिला मुकाबला मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जॉईटस खेळला जात आहे.पहिल्यांदा फलंदाजी करण्यास आलेल्या लखनऊ संघाने चांगली फलंदाजी करत धावांचा डोंगर उभा केला. लखनऊ संघाने तब्बल 199 धावा करत मुंबई इंडियन्सला जिंकण्यासाठी 200 धावांचं टार्गेट दिले आहे.

या सामन्यात लखनाऊचा कर्णधार के.एल.राहुलने एक अनोखा विक्रम केलाय. राहुलने या सामन्यात आपलं शानदार असं शतक झळकावले.राहुलने चांगल्या सरासरीने हे शतक पूर्ण केलंय. हा मुकाबला के.एल. राहुलचा 100वा मुकाबला होता. ज्यात त्याने शतक ठोकले.

के. एल.राहुल

आयपीएलच्या इतिहासात आपल्या १००व्या सामन्यात शतक झळ कावण्याची कामगिरी आजपर्यंत कोणताही खेळाडू करू शकला नव्हता. ती कामगिरी आज के.एल.राहुलने केलीय.ज्यामुळे त्याच्या नाववर हा अनोखा विक्रम झालाय.

कर्णधार राहुलने या सामन्यात 59चेंडूत १०३ धावा करत शेवटपर्यंत नाबाद राहिलाय त्याला क्विंटट डिकोक (24 धावा ) मनीष पांडे (३८ धावा) यांची मोलाची साथ लाभली.

मुंबई इंडियन्सला २ अंकांसाठी हव्यात २०० धावा.

मुंबई इंडियन्स समोर जिंकण्यासाठी आता २०० धावांचं विशाल लक्ष आहे. मुंबईचे फलंदाज आता हे लक्ष पार करू शकतात का हे पाहणे रंजक ठरणार आहे. मुंबईची या हंगामातील कामगिरी फारच सुमार राहिली आहे.आजपर्यंत ६ सामन्यात त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाहीये. आजचा सामना जिंकून ते २ गुण मिळवनार का?
हे थोड्या वेळात कळेलच जेव्हा मुंबईचे फलंदाज मैदानावर उतरतील.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here