आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
आयपीएल 2022 मध्ये अंबाती रायडू आणि भुवनेश्वर कुमारने केलेत हे अनोखे विक्रम, दिग्गज खेळाडूही नाहीत विक्रमाच्या आसपास..
सध्याचा 2022 चा आयपीएल क्रिकेटचा हंगाम दिवसेंदिवस अधिकाधिक इंटरेस्टिंग होत आहे. या क्रिकेटमध्ये नवे खेळाडू आणि नवे संघ आपली चमकदार कामगिरी करतात त्यामुळे क्रिकेट रसिक नेटिझन्स बनून त्यावर अतिशय हजरजबाबी म्हणून व्यक्त होत आहेत.
अंबाती रायडू आणि भुवनेश्वर कुमारने या मोसमात स्पेशल रेकॉर्ड (विक्रम) करून आपल्या चमकदार कामगिरीची झलक प्रदर्शित केली आहे. अंबाती रायडू हा यावेळी चेन्नई सुपर्किंगसकडून खेळत आहे तर भुवनेश्वर कुमार सनरायजर्स हैद्राबाद मध्ये आपली कामगिरी चोख बजावत आहे.
या स्पर्धेत या दोघांनी आपापल्या सामन्यात ‘रेकार्ड मेकर’ म्हणून कामगिरी केली.
आयपीएल मध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या विक्रमाची नोंद जहीरखान यांच्या नावे होती,आता हा विक्रम मोडून भुवनेश्वर कुमार याने परवा (17एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात आयपीएल मधील 150 बळी घेणारा सातवा खेळाडू होण्याचा आणि पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे.
लसीथ मलिंगा आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या नावे हा विक्रम आहे.
याशिवाय पावर प्ले मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू म्हणून भुवनेश्वर च्या नावे विक्रमाची नोंद आहे.यात त्याने सर्वाधिक 53 विकेट घेतल्यात.यात जहीर खानला त्याने मागे टाकले.
विशेष म्हणजे 2016 च्या आयपीएलचा विजेता हैद्राबाद सनरायजर्स ला बनवण्यात या खेळाडूचे मोठे योगदान आहे.त्यावेळी भुवी ने 23 विकेट घेतल्या होत्या तर 2017च्या आयपीएल मध्ये त्याने 26 विकेट घेतल्या आहेत.21च्या हंगामात त्याला फार चांगली कामगिरी करता आली नाही.
यापूर्वी पियुष चावला, हरभजनसिंग आणि अमित मिश्रा यांनी हा पल्ला गाठला आहे. आता आर.अश्विन देखील 150बळी घेण्याच्या मार्गावर आहे.त्याच्या आजतागायत 145 विकेट झाल्या आहेत.
आंबतीचा अनोखा विक्रम
चेन्नई सुपर किंग्स च्या या खेळाडूने गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना आपल्या आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडविले आणि एका विक्रमाची नोंद केली.
अंबाती रायडू याने या आयपीएल मोसमात 4000 धावा पूर्ण करताना अशी कामगिरी करणारा तो 13वा खेळाडू ठरला आहे.

17 एप्रिलच्या सामन्यात त्याने 31 चेंडूवर 46 धावा केल्यात आणि आपल्या या स्पर्धेतील कारकिर्दीत एक विक्रम नोंदविला.4 चौकार आणि 2 षटकार हाणीत त्याने आकर्षक खेळ केला.
4000 धावा करणाऱ्या रायडू याने 181 सामने खेळताना 169 डावात 4044 धावा केल्यात.यात 1 शतक, 21 अर्धशतकांचा समावेश आहेच मात्र त्याने 154 षटकार आणि 337 चौकारही ठोकलेत.
आयपीएल मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावे आहे, त्याने 6402 धावा काढल्या आहेत.यात शिखर धवन 5989, रोहित शर्मा 5725,डेव्हिड वार्नर 5580, सुरेश रैना 5528,एबी डिव्हीलीयर्स 5162,क्रिस गेल 4965, रॉबिन उथप्पा 4919, एम.धोनी 4838, दिनेश कार्तिक 4234,गौतम गंभीर 4217, अजिंक्य राहणे 4021 यांचा समावेश आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved
हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!
या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!