आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आयपीएलवर पुन्हा कोरोनाचे सावट! हा खेळाडू आढळला कोरोन पोजिटिव्ह, संपूर्ण संघच विलगीकरणात…!


सगळ्या जगातील प्रत्येक क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना आजाराने वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर अतोनात नुकसान केले आहे.

आता पुन्हा चीन मध्ये डोके वर काढलेल्या कोरोनाने त्याचे 2020 मधील विनाशकारी खेळाच्या आठवणी जागृत केल्या आहे, तीन लाटा घेऊन आलेल्या या कोरोनाने आयपीएल 2020चे हंगाम देखील बाधित केले असताना यावेळी 2022च्या हंगामात देखील क्रिकेट रसिकांच्या व खेळाडूंच्या काळजाचा ठोका या आजाराने चुकवला आहे.

 

17 एप्रिलपर्यंत चे सामने सर्वांनी एन्जॉय केले असताना आज या हंगामातील दिल्लीचा आयपीएल संघाचा एक खेळाडू कोरोनाच्या विळख्यात अडकला असून या संघाचा वैद्यकीय तज्ञ देखील या आजाराने ग्रस्त आहे.त्यामुळे 20 तारखेला होणाऱ्या या संघाच्या पुण्यातील सामन्यावर प्रश्नचिन्ह उभे टाकले आहे.

आयपीएल

या संघातील प्रत्येक खेळाडूस पुणे येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.मुंबईतच या संघाला विलगिकरणात ठेवण्यात आले असून वेळापत्रकानुसार या संघाचा 20 तारखेला पंजाब इलेव्हन सोबत पुण्यात सामना होऊ घातला आहे.16 एप्रिल रोजी दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रीक फराहार्ट यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.आता एका खेळाडूची चाचणी पॉझिटिव्ह आली, त्यामुळे संघाला मुंबईतच थांबवण्यात आले, या खेळाडूचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

गेल्या हंगामात 8 खेळाडू पॉझिटिव्ह आढळले होते.ती स्पर्धा यामुळेच थांबवण्यात आली होती.त्यावेळी 3 दिवसात 3 संघाचे 4 खेळाडू 2 कोच आणि अन्य स्टाफ मधील दोघे पॉझिटिव्ह आढल्यानंतर स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.तेव्हा 29 सामने झाले होते आणि उर्वरित 31 सामने नंतर ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती त खेळवले गेले होते.

त्यावेळी वृद्धीमान साह, वरुण चक्रवर्ती,अमित मिश्रा, कोच लक्ष्मीपती बालाजी व स्टाफचे इतर कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते हे विशेष. यावेळी स्पर्धा ऐन बहरात असतांना दिल्लीच्या संघामुळे काय निर्णय घेतला जातो याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here