आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

अभिनेता आर. माधवनच्या मुलाची ‘रुपेरी’कामगिरी, क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीवर दोन्ही क्षेत्रातील चाहते भलतेच खुश!


क्रीडा आणि कला क्षेत्र ही दोन्ही मानवी मनाला भरभरून आनंद देणारी.माणूस सिनेमाचा जितका आनंद घेतो तितका तो खेळात देखील रमतो.
त्यामुळे एखाद्या खेळाडूवरील चित्रपट बघायला लोक गर्दी करतात तसेच एखाद्या अभिनेत्याच्या मुलाच्या खेळातील कामगिरीवर देखील ते तितकेच खुश असतात.

सध्या चॉकलेट हिरो आणि दिलखुलास चेहरा असलेल्या आर.माधवन या अभिनेत्याच्या मुलाने क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीवर या दोन्ही क्षेत्रातील चाहते भलतेच खुश आहेत.

आर.माधवन यांच्यावर चित्रित दिया मिर्झा च्या विरहात गायलेल्या दिल ना किसीं से लगाना, आणि कंगना सोबतच्या तनु वेड्स मनु मधील खास पंजाबी शैलीतील सडे गल्ली गाण्यावर नेटिझन्सचा सोशल मीडियावर पाऊस पडल्याचा इतिहास फार जुना नाही.थ्री इडियट्स मधील या अभिनेत्याची भूमिका देखील तितकीच दमदार, सशक्त होती व ती सर्व तरुणाईला आवडली असल्याचे आपण बघितले.

अशा या चिरतरुण दिसणाऱ्या अभिनेत्याच्या मुलाने देखील क्रीडा क्षेत्रातील आपल्या आवडत्या स्विमिंग इव्हेंट मध्ये यशाचे झेंडे रोवायला सुरवात केली आणि या बाप-लेकांवर नेटीझन्सनी पुन्हा कौतुकाचा वर्षाव सुरू केला.
याला निमित्त ठरले या प्रतिभावान अभिनेत्याच्या गुणी मुलाची स्विमिंग स्पर्धेतील दमदार, नेत्रदीपक कामगिरीचे.

आर. माधवन

डेन्मार्कच्या कोपनहेगन येथे सुरू असलेल्या दानिश स्विमिंग ओपन चॅम्पियनशीप मध्ये अभिनेता आर.माधवनचा अवघा 17 वर्षीय गुणी मुलगा वेदांत माधवन याने 1500 मीटर फ्रिस्टाईल स्विमिंग स्पर्धेत परवाच्या दिवशी सिल्व्हर मेडलवर आपले नाव कोरले आणि ही रुपेरी कामगिरी करीत भारतीय रसिकांच्या कौतुकास देखील पात्र ठरला.

आर.माधवन यांनी सोशल मीडियावर आपल्या पुत्राचा मेडल मिळवलेला फोटो शेअर करून कोच चे आभार मानले. विशेष म्हणजे वेदांत ने गेल्यावर्षी झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर जलतरण चॅम्पियनशीपमध्ये देखील उत्तम कामगिरी केली होती यात त्याने 4 सिल्व्हर व 3 ब्रॉंझ मेडल जिंकली.वेदांतने मार्च 2021 मध्ये झालेल्या लातव्हिया ओपन स्पर्धेत देखील ब्रान्झ मेडल जिंकले आहे.

कोपनहेगन येथे सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत वेदांत शिवाय स्वीमर साजन प्रकाश ने 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताचा गौरव वाढविला आहे.

अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवन याने आज डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या डॅनिश ओपन स्वीमिंग चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियासाठी 800 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक जिंकले. हे त्याचे दुसरे पदक आहे.

काल त्याने 1500 मीटर फ्रीस्टाइलमध्ये रौप्य पदक जिंकले आहेच.यापूर्वी तो अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेता ठरला आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकत असल्याने भारताचा गौरव होत आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here