आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आगामी टी-20 सामन्यांसाठी आयपीएलमधील ‘या’ खेळाडूंवर निवड समितीची असेल ‘नजर’, चांगली कामगिरी केल्यास मिळू शकते मोठी संधी!


आयपीएल सध्या जोमात आहे.कोरोना नंतर अगदी खुल्या दिलाने खेळाडू कोणत्याही दडपणाशिवाय खेळत आहेत आणि क्रिकेट रसिक देखील त्यांचा उत्साह द्विगुणित करीत आहेत.
विशेष म्हणजे या हंगामात सहभागी असलेल्या संघात प्रस्थापित खेळाडूंपेक्षा नवोदित युवा खेळाडूंची कामगिरी चाहत्यांना सुखावणारी तर आहेच पण यातून नवे टॅलेंट उदयास येत असल्याने भारतीय क्रिकेट निवड समिती देखील या गुणी खेळाडूंवर लक्ष ठेऊन आहे.

उल्लेखनीय म्हणजे या आयपीएल हंगामानंतर आगामी जून महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्ध खेळाव्याच्या टी-20 झटपट सामन्यांसाठी भारतीय संघाला टॅलेंटेड खेळाडू मिळू शकतात,त्याअनुषंगाने निवड समिती या युवा गुणी खेळाडूंच्या केवळ कमिगिरीवरच नव्हे तर फॉर्मवर देखील लक्ष ठेऊन आहे.

यात सर्वाधिक चर्चा आहे ती जलदगती गोलंदाज जम्मू काश्मीरचा तरुण खेळाडू उमरान मलिक याची.

आयपीएल

हैद्राबाद संघाकडून खेळत असलेल्या या खेळाडूच्या फास्ट बॉलिंगच्या शैलीची सुनील गावस्कर, रवी शास्त्री आदि भारतातील महान खेळाडूंनी प्रशंसा तर केलीच पण विदेशी संघातील खेळाडू देखील त्याची तारीफ करण्यापासून स्वतःला रोकू शकत नाहीत,भारतीय क्रिकेट मंडळातील निवड समितीतील चेतन शर्मा हे त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेऊन आहेत.

याशिवाय आयपीएल मध्ये चमकदार कामगिरी करणारे प्रसिद्ध कृष्णा,के.टी. नटराजन, अरश्दीप सिंह,यांच्यावर देखील मंडळाची नजर आहे.

जसप्रीत बुमराह, आवेश खान, भुवनेश्वर कुमार,मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, दीपक चाहर हे देखील संघ निवडीच्या रांगेत आहेत.
आस्ट्रेलियात होऊ घातलेल्या आगामी टी.20 वर्ल्डकप साठी देखील भारतीय संघातील गोलंदाजी मजबूत असावी यादृष्टीने क्रिकेट मंडळ अशा टॅलेंटेड खेळाडूंचा एक संच तयार करीत आहे.
आगामी 9,12,14,17 आणि 20 जूनला भारतीय संघ द.आफ्रिकेविरुद्ध टी. सामने खेळणार आहे.त्यानंतर 26व28 जूनला आयर्लंड विरुद्ध 2 टी.20 सामने खेळले जातील.यासाठी नव्या दमाचे खेळाडू आयपीएल मधील त्यांच्या दमदार कामगिरीच्या आधारावर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवू शकतात.यात कोण बाजी मारणार ते बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here