आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यात होऊ शकतात हे 3 मोठे विक्रम, हे महान खेळाडू आहेत विक्रमाच्या उंबरठ्यावर..


आयपीएलचा हा पंधरावा हंगाम अतिशय रंजक होत चालला आहे,प्ले ऑफ मध्ये येण्यासाठी आज खेंळणारे दोन्ही संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करतीलच पण या सामन्यात काही खेळाडू आपल्या नावे अनोखे विक्रम करण्यासाठी देखील उत्सुक आहेत, त्यामुळे आजचा हा आयपीएल मधील 32 वा सामना क्रिकेट रसिकांसाठी जितका उत्कंठावर्धक आहे तितकाच तो दिल्ली आणि पंजाब संघासाठी देखील अतिशय महत्वाचा आहे, नाही म्हणायला दिल्ली संघाला कोरोनाने गालबोट लावले असले तरी हा सामना रद्द न करता खेळवला जात असल्याने ही उत्कंठा आता शिगेला पोहचली आहे.

कोण आहेत हे विक्रमाच्या उंबरठ्यावरील खेळाडू?
विक्रम

अक्षर पटेल : दिल्लीच्या संघातून खेळणारा अक्षर पटेल हा फिरकी गोलंदाज एका मोठ्या विक्रमाच्या जवळ आहे. त्याला दोन विक्रम करण्यासाठी अवघ्या काही बळींची गरज आहे.आयपीएल मध्ये 100 बळींचा पल्ला गाठण्यासाठी त्याला केवळ 4 विकेट्सची गरज आहे. आज त्याची फिरकी काय जादू करते ते बघणे इंटरेस्टिंग आहे, एवढंच कशाला टी-20 सामन्यात 150 बळी पूर्ण करण्यासाठी अक्षरला केवळ 3 विकेट्स हव्यात.

शिखर धवन: पंजाब संघाचा स्टार खेळाडू शिखर धवन हा देखील अशाच विक्रमाच्या प्रतीक्षेत आहे, फलंदाजीत त्याला ही कामगिरी करून दाखवायची आहे.आयपीएल मध्ये त्याने 5989 धावा केल्या आहेत, 11 धावांची आजच्या सामन्यात त्याने भर घातली तर 6हजार धावांचा पल्ला गाठणारा तो विराट कोहली नंतर दुसरा खेळाडू बनेल.विराटच्या 6402 धावा केल्यात.याशिवाय धवनला टी-20 स्पर्धेत 9 हजार धावा करण्यासाठी 20 धावांची गरज आहे, त्यामुळे धवन ही कामगिरी करणार का यादृष्टीने आजचा सामना सर्वांसाठी उत्सुकतेचा व महत्वाचा आहे.

डेव्हिड वार्न: आणखी विक्रम आजच्या सामन्यात दिल्ली संघाचा खेळाडू डेव्हिड वार्नर देखील करू शकतो. आयपीएल मध्ये 100 चौकार पूर्ण करण्यासाठी आजच्या सामन्यात या खेळाडूला 4 चौकार हाणावे लागतील.याआधी शिखर धवनने ही कामगिरी केलेली आहे.

या स्पर्धेत सर्वात कमी वयाचे खेळाडू अनेक आहेत.दिल्लीचा पृथ्वी शॉ देखील आज एका विक्रमाची नोंद आपल्या नावे करू शकतो.1500 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला अवघ्या 19 धावांची गरज आहे, त्या पूर्ण केल्यात तर हा पल्ला गाठणारा ऋषभ पंत नंतर तो दुसरा कमी वयाचा खेळाडू ठरणार आहे.

जॉन बेयर्स्ट या खेळाडूला टी- 20 मध्ये 4000 धावा पूर्ण करण्यासाठी 64 धावांची गरज आहे, बघूया हा खेळाडू ही कठिण कामगिरी आज पार पाडेल का?


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here