आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

सुकेश चंद्रशेखरने दिलेल्या महागड्या वस्तुनंतर आता इडीनेही अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दणका दिलाय..


बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिच्यावर ईडीने कारवाई केली आहे. जॅकलिनवर ईडीची मोठी कारवाई आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीची सात कोटींहून अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने 7 कोटी रुपयांच्या भेटवस्तू आणि मालमत्ता जप्त केल्या आहेत.  भेटीपोटी मिळालेल्या वस्तू या गुन्ह्यातून होत्या. या भेटवस्तू आणि मालमत्ता सुकेश चंद्रशेखर यांनी दिल्या होत्या, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

sukesh chandrasekhar money laundering case jacqueline fernandez romantic  photo with conman viral check out here: Sukesh Chandrasekhar Money  Laundering Case में आया नया ट्विस्ट, वायरल फोटो में Jacqueline Fernandez को  ...

जॅकलिन फर्नांडिसने हिच्या संमतीशिवाय सुकेश चंद्रशेखरसोबतचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर जॅकलिन अधिक चर्चेत आली. तसेच  सुकेश चंद्रशेखर याचा समावेश असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समावेश आहे. त्याच्याशी संलग्न मालमत्ताबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.

 सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केल्यानंतर तिला सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्याचे आढळून आले.

हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जात आहे. सुकेश चंद्रशेकरने जॅकलीन फर्नांडिसला प्रपोज करुन हिऱ्याची अंगठी दिल्याचे ताज्या अहवालातून समोर आले आहे. या हिऱ्याच्या अंगठीवर J आणि S ही अक्षरे होती.

जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो आल्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची अटकळ बांधली जात होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही समोर आले आहे की अभिनेत्रीला सुकेशकडून करोडोंची भेट देखील मिळाली होती, ज्यामध्ये 9 लाख रुपये किमतीचा घोडा आणि 52 लाख किमतीची पर्शियन कार होती.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here