आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

“राज ठाकरेंच्या सभा म्हणजे कोरोनानंतरचे फुकट मनोरंजन”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


हिंदुत्वाच्या, मराठीच्या नव्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. असे खेळाडू कोणत्या कोणत्या मैदानात कोणकोणते खेळ करतात हे आतापर्यंत जनतेने अनुभवलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, कधी याचा खेळ, कधी त्याचा खेळ, असे काही खेळाडू खेळ करतात.

दोन वर्ष लॉकडॉऊन आणि कोरोनात गेले. यामध्ये नाटक, थिएटर, मनोरंजन पूर्ण बंद होतं, त्यामुळे फुकट करमणूक होत असेल तर का नाही पाहायची? असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.

गुढीपाडवा मेळ्याव्यापासून राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक झाले आहेत. मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत मनसे अधिक आक्रमक होत आहे.

उद्धव ठाकरे

राज ठाकरे यांचा पक्षाचा झेंडाही अलीकडे पूर्ण भगवा झाला आहे. राज ठाकरे याचं स्वागत विविध ठिकाणी भगव्या शालीने केले जात आहे. यामुळे आता मनसेची वाटचाल आक्रमक हिंदुत्वाकडे कललेली असून, प्रखर हिंदुत्त्वाचा मुद्दा मनसेने हाती घेतला आहे. यापार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

आधी मराठी म्हणून इतर भाषिकांना हाकलून द्यायचं आणि आता हिंदू म्हणून त्यांना घरात घ्यायचं, हे माकडचाळे आहेत. असे माकडचाळे करणारे खूप असतात. अशा गोष्टी ढोंग आहेत. भोंगा हा विषय संपूर्ण देशासाठी आहे. भोंगाबंदी केंद्राने देशभर करायला हवी.


=

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here