आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

“राज ठाकरेला भाजपने सुपारी दिलीय”, शिवसेनेच्या या नेत्यानी केली कडाडून टीका…


आज (१ मे ) महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असून या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी राज ठाकरेंनी भाजपकडून सुपारी घेतलीये, अशी टीका केली आहे.

स्वतःच न्यायव्यवस्था असल्यासारखं वागलं की काय होतं ते आज पाहिलं - डॉ. नीलम  गोऱ्हे - Maharashtra Lokmanch

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,‘राज ठाकरेंनी भाजपकडून सुपारी घेतली आहे.’ तसेच हनुमान चालीसा किंवा धार्मिक गोष्टींचा वापर केवळ आणि केवळ राजकीय हत्यार म्हणून केला जात आहे आणि त्यासंदर्भामध्ये कुठे तरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे’, असेही त्या म्हणाल्या.राज ठाकरे

दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. तसेच राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता.

ही मुदत संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here