आशिया कप स्पर्धेत हे 3 खेळाडू खेचून आणू शकतात विजय, ट्रॉफी जिंकायची असेल तर यांची चांगली कामगिरी आवश्यक..
सोमवारी (८ ऑगस्ट) बीसीसीआयने (Bcci) आशिया चषक २०२२ स्पर्धेसाठी (Asia Cup 2022) भारतीय संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेतून विराट कोहली ( Virat Kohli) आणि केएल राहुल (Kl Rahul) सारखे फलंदाज पुनरागमन करणार आहेत. तर संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करताना दिसून येणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. यावेळी काही युवा खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे. जे भारतीय संघाला आठव्यांदा जेतेपद मिळवून देऊ शकतात. आम्ही या लेखातून तुम्हाला अशा ३ खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, जे या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावू शकतात.
हेही वाचा: देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
१) रिषभ पंत (Rishabh pant ) : भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडला आहे, अशा परिस्थितीत रिषभ पंत भारतीय संघासाठी संकटमोचक ठरला आहे. रिषभ पंत एका हाताने षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. मात्र विकेटकिपिंगमध्ये देखील तो जबरदस्त कामगिरी करत असतो. सध्या तो जोरदार फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिज विरुध्द खेळलेल्या ४ टी -२० सामन्यांमध्ये त्याने ११५ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या चौथ्या टी -२० सामन्यात त्याने ४४ धावांची तुफानी खेळी केली होती. आतापर्यंत त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५४ सामन्यांमध्ये ८८३ धावा केल्या आहेत. त्याची ही कामगिरी पाहता तो आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो.
२) दीपक हुड्डा (Deepak Hooda) : या यादीत दुसऱ्या स्थानी आहे, भारतीय संघातील विस्फोटक फलंदाज दीपक हुड्डा. आयर्लंड विरुद्ध तुफानी शतक झळकावत या फलंदाजाने भारतीय संघातील आपले स्थान जवळ जवळ निश्चित केले आहे. आपला संघ पराभूत होत असताना हा फलंदाज आक्रमक फलंदाजी करून सामना जिंकून देऊ शकतो. आक्रमक फलंदाजीसह तो फिरकी गोलंदाजी देखील करतो. दीपक हुड्डाने आतापर्यंत भारतीय संघासाठी एकूण ९ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २७४ धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतकी खेळीचा देखील समावेश आहे.
३) सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) : सूर्यकुमार यादव हा सध्या भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे.२०२१ मध्ये त्याने भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. अवघ्या काही महिन्यांमध्ये त्याने आयसीसीच्या टी -२० फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. लवकरच तो पहिल्या स्थानी येऊ शकतो. त्याला भारतीय संघातील मिस्टर ३६० देखील म्हटले जाते. कारण तो एबी डिविलियर्स प्रमाणेच मैदानाच्या चारही बाजूंना शॉट खेळतो. त्याने भारतीय संघासाठी एकूण २३ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १ शतकाच्या साहाय्याने ६७२ धावा केल्या आहेत. त्यामुळे सूर्यकुमार यादव देखील भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो.
काय वाटतं? यापैकी कुठला फलंदाज आगामी आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करू शकतो? कमेंट करून नक्की कळवा..
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..