
पाकिस्तानमध्ये आहेत ही 5 प्रसिद्ध हिंदू मंदिर, आज तिथे आहे अशी परिस्थिती….
आपल्या भारत देशात अनेक प्राचीन आणि प्रसिध्द हिंदू मंदिरे आहेत ज्यांची चर्चा पूर्ण जगभरात होतच असते.आपल्या देशालील मंदिरे हे प्राचीन हिंदू वास्तुकलेचे जिवंत उदाहरण आहेत. परंतु आपणास त्या मंदिरांबद्दल माहित आहे का; जे आपल्या शेजारी देश मुस्लीम लोकसंख्या जास्त असलेल्या पाकिस्तानमध्ये आहेत.
कधीकाळी पाकिस्तानची भूमी हि आर्यांची प्राचीन भूमी होती. सिंधू नदीचा लगभग ७० % हिस्सा हा पाकिस्तानमधेच वाहतो. सिंधू , सरस्वती आणी गंगा नदीन्च्या किनाऱ्यावरच प्राचीन भारतीय संस्कृतीचा उगम झाला होता. “सिंधुविना अपूर्ण आहे हिंदू संस्कृती” असेही म्हणाल्या जाते. पाकिस्तानमधेच हडप्पा आणी मोहंजोदाडो च्या प्राचीन नगरांचे अवशेष मिळाले आहेत.
भारत – पाकिस्तानच्या फाळणी नंतर पाकिस्तानमधील अनेक मंदिरे उद्वस्त केल्या गेली. पाकिस्तानमध्ये मंदिर सापडणे म्हणजे वाळवंटात पाणी सापडण्यासारखे आहे परंतु , पाकिस्तान मध्ये आजही अनेक हिंदू परिवार रहातात त्यामुळे येथे आजही अनेक हिंदू मंदिर अस्तित्वात आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत अशाच पाकिस्तानमधील प्रसिद्ध हिंदू मंदिरांबद्दल ज्याठिकाणी आजही हिंदू धर्माची जयजयकार केल्या जाते….
१ ) हिंगलाज माता मंदिर शक्तीपीठ ( बलुचिस्तान )
जगातील प्रमुख मंदिरांपैकी एक नानी मंदिर म्हणून ओळखले जाणारे हिंगलाज माता मंदिर हे सती देवीचे एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. सिंध प्रांताची राजधानी कराची जिल्ह्यातील बाडीकला मध्ये सुंदर डोंगरांमध्ये हिंगलाज माताचे मंदिर स्थित आहे. हि जागा पाकिस्तानने जबरन कब्जा केलेल्या बलुचिस्तान मध्ये आहे. जेंव्हा भगवान विष्णू यांनी सती मातेचे शव कापण्यासाठी त्यांच्यावर सुदर्शन चक्र फेकले होते. त्यामुळे माता सतीचे सर (डोके) ज्या ठिकाणी पडले त्याच ठिकाणी आज हे हिंगलाज माता मंदिर आहे.
हिंगोल नदीच्या किनाऱ्यावर बनलेले हिंगलाज मंदिर हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. या ठिकाणी मत सती कोटटरी रुपामध्ये आणि भगवान शंकर हे भिमलोचन भैरव अवतारामध्ये प्रतिष्ठित आहेत. या ठिकाणी पाकिस्तान आणि जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अशे पण म्हणले जाते कि ; ब्राम्हण (रावण) यांच्या हत्येच्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी भगवान राम यांनीसुद्धा येथे काही वेळ घालवला होता.

२ ) कटासराज शिव मंदिर (चकवाल)
पाकिस्तान मधील पंजाब प्रांतामधील चकवाल जिल्ह्याच्या ठिकाणापासून दक्षिणेस ३० किमी दूर अंतरावर कोहिस्तान हि हे मिठाचे पर्वत आहेत. येथेच महाभारतकालीन कटासराज हे गाव आहे. येथेच स्थित आहे हे ९०० वर्षे जुने प्राचीन शिव मंदिर. या मंदिराच्या परिसरात श्रीराम , हनुमान, आणि शिव मंदिर आहेत.
हिंदू पुराणांनुसार अशी मान्यता आहे कि, जेंव्हा महादेवाची पत्नी सतीचा मृत्यू झाला त्यावेळी महादेवाच्या डोळ्यातून अश्रुंचे दोन थेंब जमिनीवर पडले होते. या थेंबामुळे पृथ्वीवर दोन तलाव बनले. यामधी एक तलाव कतासराज येथे तर दुसरा राजस्थानमधील पुष्कर येथे आहे. शिवपुराणानुसार भगवान शिव यांनी सतीसोबत विवाह केल्यानंतर अनेक वर्ष येथे वास्तव्य केले होते.
३ ) नृसिंह मंदिर ( मुल्तान )
भक्त प्रह्लाद यांनी भगवान नरसिंह यांच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधले होते. ते मंदिर सध्या पाकिस्तानमधील पंजाब, मुल्तान येथे आहे. हे मंदिर प्राचीन काळी श्रीहरीचे ‘भक्त प्रह्लादांचे मंदिर’ म्हणून ओळखले जात असे. प्रल्हादपुरी मंदिर असे या मंदिराचे नाव आहे. जगातील प्रसिद्ध मुल्तानच्या किल्ल्यात बांधलेले हे मंदिर एकेकाळी मुल्तान शहराची ओळख होती.
होळी दरम्यान येथे विशेष पूजा अर्चना आयोजित केली जाते. या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की भगवान नरसिंह एका खांबामधून बाहेर आले आणि त्यांनी प्रह्लादचे वडील हिरण्यकश्यपचा वध केला. असे मानले जाते की होळीचा सण आणि होलिका दहनचा प्रारंभ देखील येथूनच झाला.
४ ) श्री वरुणदेव मंदिर ( मनोरा )

पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील कराचीच्या मानोरा आयलँडमध्ये बांधलेले हे मंदिर 100 वर्षांहून अधिक जुने आहे. श्रीवरुन देव मंदिर आता पाकिस्तानच्या हिंदु परिषदेच्या कामांसाठी वापरले जाते. असे म्हणतात की हे मंदिर १६ व्या शतकापासून अस्तित्वात आहे. १९४७ मध्ये फाळणीनंतर हे आश्चर्यकारक मंदिर पाकिस्तानी भूमी माफियांनी ताब्यात घेतले.
२००७ मध्ये पाकिस्तान हिंदु परिषदेने या क्षतिग्रस्त आणी बंद पडलेल्या मंदिराचे पुन्हा बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. जून २००७ मध्ये या मंदिराचा ताबा पीएचसीला मिळाला. परंतु या मंदिराची कोणीही देखरेख करत नाही. हे मंदिर हिंदू वास्तुकलेच एक उत्कृष्ट नमुनाआहे. महासागराचा देव वरुण यांना समर्पित हे मंदिर आज चांगल्या स्थितीत नाही आणि येथे पूजा पण केली जात नाही.
५ ) पंचमुखी हनुमान मंदिर ( कराची )
कराचीमधील जुना क्वार्टर सोल्जर बाजारमध्ये असलेले पंचमुखी हनुमान मंदिर हे १५०० वर्ष जुने त्रेतायुगातील प्राचीन मंदिर आहे. कराचीला भेट देणारे बहुतेक हिंदू भाविक या मंदिरात येऊन प्रार्थना करतात. या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे, येथील हनुमान मूर्ती हि कोणीही बनवलेली नसून येथे नैसर्गिकरित्या सापडली होती. आणि याच ठिकाणी हे मंदिर बांधल्या गेले. हि मूर्ती सर्व पाच देवतांचे प्रतिनिधित्व करते. या मंदिराचा उल्लेख अल-बरुनीच्या किताब-उल-हिंदमध्येही आढळला आहे. १८८२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. आजच्या वेळी या मंदिराला नूतनीकरणाची नितांत आवश्यकता आहे.
हेही वाचा:
केवळ अधर्माच्या बाजूने युद्ध केल्यामुळे या योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागलाय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..