रोहित शर्मामुळे या 5 खेळाडूंचे करिअर झाले बरबाद, अन्यथा आज बनले असते स्टार खेळाडू…
जसे की आपण सर्वजण जाणतो की रोहित शर्मा हा भारतीय संघाचा असा खेळाडू आहे जो गेल्या वर्षांपासून टीम इंडियाचा कर्णधार म्हणून खेळत आहे आणि तो टीम इंडियासाठी एकापेक्षा एक जबरदस्त खेळी करत आहे. पण रोहित शर्माच्या या जबरदस्त फॉर्ममुळे संघात जागा मिळण्याची वाट पाहणाऱ्या काही खेळाडूंना संधीच मिळाली नाही.
महेंद्रसिंग धोनीनंतर रोहित शर्माला टीम इंडियात पदार्पणाची संधी मिळाल्यानंतर तो एक चांगला खेळाडू म्हणून उदयास आला. त्याने 2007 साली आयर्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला, कालांतराने रोहित शर्माला संधी मिळत गेली आणो तो त्या संधीचा फायदे घेत स्वतःला सिद्ध करत गेला.
रोहित शर्माने या संधीचा फायदा घेतला,आणि तो हळुहळू टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू बनला आहे, पण हे जाणून आश्चर्य वाटेल की रोहित शर्मासोबतच संघात पदार्पण करणारे काही खेळाडू असेही आहेत ज्यांना रोहितच्या जबरदस्त फॉर्ममुळे स्वतःला सिद्ध करण्याची संधीच मिळाली नाही. रोहित फॉर्ममध्ये चालत संघासाठी धावा काढत राहिला आणि दुसरीकडे हे खेळाडू बेंचवरचं बसून राहिले.
चला तर जाणून घेऊया नक्की कोणते आहेत ते खेळाडू , ज्यांचं करिअर रोहित शर्मामुळे संपलं.
युसूफ पठाण युसूफ पठाणने 22 डिसेंबर 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी टीम इंडियात प्रवेश केला. रोहित शर्माच्या पदार्पणानंतर पदार्पण करणाऱ्या पठाणला संघात स्थान देण्यात आलं पण तो काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे रोहितला त्याच्याजागी पुन्हा संधी दिली आणि रोहितने पुन्हा खोऱ्याने धावा काढल्या. असंच प्रत्येक मालिकेत आत- बाहेर होऊन शेवटी 2011 मध्ये युसुफ पठाणला अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त व्हावं लागलं,कारण रोहितच्या तगड्या फलंदाजीने त्याला संघात पुन्हा जागाच मिळाली नाही.
युसूफ पठाणने त्याच्या छोट्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत आणि सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे. युसूफ पठाणने 27 57 एकदिवसीय सामने खेळले आहेत तर 22 टी-२० सामने देखील खेळले आहेत .

प्रवीण कुमार: प्रवीण कुमारने 18 नोव्हेंबर 2007 रोजी टीम इंडियात एंट्री केली होती.पण संधी न मिळाल्यामुळे 2011 मध्येचं निवृत्ती जाहीर केली. प्रवीण कुमारने शेवटचा सामना खेळला तो 2012 मध्येत्यांतर तो क्रिकेटच्या मैदानावर दिसला नाही.
त्यालाही संघात जास्त संधी न मिळण्याचे कारण रोहित शर्माचं असल्याचं बोललं जात. कारण रोहित त्या वेळी जबरदस्त फॉर्ममधून जात होता आणि त्याला बाहेर काढून नवीन खेळाडूंना आजमावून पाहण्याची रिस्क निवड समिती घेण्यास तयार नव्हती..
म्हणूनच प्रवीण कुमारने संभावित परिस्थिती लक्षात घेत टीम इंडियातून निवृत्ती जाहीर केली. त्याने भारतासाठी काही महत्त्वाचे सामने जिंकले आहेत, त्याने भारतासाठी सहा कसोटी, 68 एकदिवसीय सामने खेळले आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत.
सुब्रमण्यम बद्रीनाथ: सुब्रमण्यम बद्रीनाथने देखील 20 ऑगस्ट 2008 मध्ये टीम इंडियात प्रवेश केला होता. बद्रीनाथकडे चांगले फलंदाजी कौशल्य होते ज्यामुळे तो इतर फलंदाजांपेक्षा वेगळा होता, तो आयपीएलमध्ये चेन्नईकडूनही खेळला होता ज्यामध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट होती परंतु भारतीय निवडकर्त्यांनी त्याच्याकडे सतत दुर्लक्ष केले. ज्यामुळे तो जास्त काळ टीम इंडियामध्ये टिकू शकला नाही.
प्रज्ञान ओझा: प्रज्ञान ओझाने 28 जून 2008 रोजी टीम इंडियामध्ये पदार्पण केले. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्यानंतर प्रज्ञान ओझा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून टीम इंडियामध्ये ओळखला जाऊ लागला. पण एका सामन्यात त्याला दुखापत झाली आणि तो संघाबाहेर गेला.

दुखापतीतून सावरल्यानंतरही मात्र संघातील दुसरे खेळाडू चांगल प्रदर्शन करत असल्यामुळे त्याला संघात पुन्हा संधी मिळाली नाही. तो फक्त एखाद्या खेळाडूच्या बदली खेळाडू म्हणूनच संघाचा भाग राहू लागला.
शेवटी त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने भारतासाठी 24 कसोटी, अठरा वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत.
मनप्रीत गोनी: मनप्रीत गोनीने 25 जून 2008 रोजी भारतीय संघात एंट्री घेतली, आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना त्याने नाव कमावले, आयपीएलमध्येच प्रसिद्धीस आल्यानंतर त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला. मनप्रीत गोनी आशिया कपमध्ये भारताकडून खेळला.
पण त्यानंतर त्याला जास्त संधी देण्यात आली नाही आणि तो राजकारणाचा बळी ठरला, काही सामने खेळून तो कायम राखीव खेळाडू म्हणून संघात निवडला जाऊ लागला. आणि शेवटी काही दिवसांतच तो अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने भारतासाठी फक्त 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 2 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा:
देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..