ऋषभ पंत की दिनेश कार्तिक? आशिया कप मधील सामन्यात कोणाला मिळणार संधी? कप्तान रोहित शर्माने सांगितला आपला मास्टर प्लान..
या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ आपली संघबांधणी करत आहे. T20 विश्वचषकापूर्वी भारतासमोर आशिया कपसारखी मोठी स्पर्धा आहे. आशिया कप साठी दोन दिवसापूर्विच भारतीय संघाची घोषणा झाली ज्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
अशा स्थितीत त्यांच्या जागी दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडावे लागणार आहे. पण संघ व्यवस्थापनासाठी कोणत्या दोन खेळाडूंना संघाच्या बाहेर बसवावे हा मोठा प्रश्न आहे. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यातून एकाला संघाच्या बाहेर बसावे लागणार आहे. आशिया चषक स्पर्धेत पंत आणि कार्तिक दोघेही टीम इंडियामध्ये सहभागी आहेत. अशा परिस्थितीत पंत किंवा कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची की नाही हे संघाला ठरवावे लागेल. असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक साबा करीम यांनी व्यक्त केले आहे.
27 ऑगस्टपासून यूएईमध्ये आशिया कपला सुरुवात होत आहे. आशिया कपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची क्रमवारी ठरवण्याची संधी आहे. कार्तिक भारतीय संघात परतल्यापासून चांगली कामगिरी करत आहे. कार्तिक भारतीय संघात फिनिशरची भूमिका बजावू शकतो.
इंग्लंडविरुद्ध पंत दोन सामन्यात सलामीला आला होता. पंतने आजपर्यंत T20 सामन्यात संमिश्र कामगिरी केली आहे. स्पोर्ट्स 18 वरील ‘स्पोर्ट्स ओव्हर द टॉप’ शोमध्ये करीम म्हणाला, ‘मला वाटतं भारताने हार्दिक पांड्यासोबत 6 गोलंदाजी पर्याय म्हणून चांगली कामगिरी केली आहे. मग अशा प्रकारचे कॉम्बिनेशन तोडून सातव्या क्रमांकावर दिनेश कार्तिकला संधी द्यायची का?
तो पुढे म्हणाला, जर कार्तिक 7 क्रमांकावर खेळला तर तुम्ही हार्दिकसह 4 गोलंदाजांसोबत जाऊ शकता. हार्दिककडून 4 षटके टाकणे अपेक्षित आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाचा हा एक मोठा निर्णय असू शकतो.
तो म्हणाला, मी रोहित शर्माच्या कर्णधारपदावरून जे पाहिले आहे. त्यावरून मला वाटते की त्याला पाच नियमित गोलंदाज आणि हार्दिक पांड्याला सहा गोलंदाजी पर्याय म्हणून आवडेल. तसे असेल तर तुम्हाला ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यातील एकाची निवड करावी लागेल.
करीम म्हणाला की, पंत किंवा कार्तिक यापैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याने भारताला T20 मध्ये चौथे स्थान भरण्यास मदत होईल. करीमने पुढे सूर्यकुमार, पंड्या आणि पंत यांना चार, पाच आणि सहा क्रमांकावर फलंदाज म्हणून निवडले आहे. तर केएल राहुल रोहित शर्मा ही सलामी जोडी म्हणुन निवडले आहे.
25 मे रोजी कोलकाता येथे आयपीएल 2022 च्या एलिमिनेटरच्या सामन्यापासून राहुल मैदानाबाहेर आहे. त्यानंतर जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी राहुलची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
पण दुखापतीमुळे तो नवी दिल्लीतील सलामीच्या सामन्यापूर्वी मालिकेतून बाहेर पडला. यानंतर राहुल जर्मनीत शस्त्रक्रिया करण्यासाठी इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला होता. भारताच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेदरम्यान तो पुनरागमन करण्याच्या तयारीत होता. परंतु दौऱ्यापूर्वी त्याला कोरोनाव्हायरसची लागण झाली.
त्यानंतर त्याची कॅरिबियन दौऱ्यातही निवड झाली नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यांमध्ये त्याला अचानकपणे संघात सामील करण्यात आले. राहुल आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकात खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
तो म्हणाला, ‘केएल राहुल उपकर्णधार असल्याने मी त्याला रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून पाहतो. मी विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर ठेवतो. पण तुम्हाला माहीत आहे की, 4,5,6 क्रमांकाचा खेळाडू खूप स्फोटक असावा. कारण T20 फॉरमॅटमध्ये तुम्ही 4,5,6 बघता जे तुमच्यासाठी सामने पूर्ण करू शकतात. गरज पडल्यास पॉवर हिटर म्हणूनही योगदान देऊ शकतात.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..