आपल्या 1 वर्षाच्या मुलाला पोटाला बांधून शहरात रिक्षा चालवतेय ही महिला, पोट भरण्यासाठी करतेय जिद्दीने संघर्ष..
जीवन जगण्यासाठी लोक अनेक मार्गांनी संघर्ष करतात.काहींसाठी आयुष्य खूप सोपे आणि मजेशीर असते तर काहींसाठी हे जीवन संघर्षाचे दुसरे नाव आहे. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत जी सतत आपल्या आयुष्याची लढाई लढत असते.
आजकाल छत्तीसगडमधील अंबिकापूर शहरात तारा प्रजापती नावाची महिला रोज रस्त्यावर ऑटो चालवतांना दिसते. तारा प्रजापती असे या महिलेचे नाव असून तिने आपल्या धैर्यापुढे चांगल्या आणि सामर्थ्यवान लोकांना नतमस्तक केले आहे. ही महिला 1 वर्षाच्या मुलाची आई देखील आहे आणि आपल्या मुलाला पोटावर बांधून ही महिला ऑटो चालक म्हणून काम करते. तारा प्रजापती प्रत्येक स्त्रीसाठी एक प्रेरणा आहे आणि लोकांना जीवनातील संघर्षाला कस सामोरी जायचं हे शिकवतेय.
छत्तीसगडच्या अंबिकापूर शहरात तारा प्रजापतीबद्दल कोणाला काही जरी विचारलं तर त्या बदल्यात एकच उत्तर ऐकायला मिळेल की ती खूप धाडसी स्त्री आहे.तारा प्रजापती रोज तिचं धाडस दाखवते.तिच्या मुलाला आपल्या कुशीत घेऊन ती शहरात ऑटो चालवण्याचे काम करत आहे आणि यातून स्वतःची आणि मुलाची काळजी घेत आहे.
हेही वाचा: देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
तारासाठी हे काम अजिबात सोपं नसून तिला हे काम जबरदस्तीने करावं लागतं. तरीही ती तिच्या कामाच्या दरम्यान मुलाची पूर्ण काळजीघेता यावी म्हणून घरातून बाहेर पडताना ती पाण्याची बाटली सोबत ठेवते, जेणेकरून तिला गरज असेल तेव्हा ती आपल्या बाळाला पाजू शकेल. ताराने हे सिद्ध केले आहे की माणसाला हवे असेल तर तो स्वतःचे मार्ग स्वतः बनवू शकतो आणि त्यावर एकटाच वाटचाल करू शकतो.
तारा प्रजापतीचे जीवन अनेक संघर्ष आणि वंचितांनी भरलेले आहे. आणि त्यामुळेच तिला सध्या पोट भरण्यासाठी ऑटो चालवण्याचे काम करावे लागले. ताराने वाणिज्य शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. 10 वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते, जेव्हा तिचे लग्न झाले तेव्हा तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि त्यांचे पती ऑटो चालक म्हणून काम करायचे. ताराने ठरवले की ती तिच्या पतीसोबत पाऊल टाकून त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती योग्य बनवायची आणि म्हणूनच ताराने ऑटो ड्रायव्हर होण्याचा निर्णय घेतला आणि तिने ऑटो चालवायला सुरुवात केली.
तारा प्रजापती सांगते की ती एका गरीब कुटुंबातील आहे आणि तिच्या मुलाची काळजी घेण्यासाठी कुटुंबात कोणीही नाही. त्यामुळे तिला मुलाला सोबत घ्यावे लागते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांचा ऑटो चालवणेही आवश्यक आहे. तारा सांगते की, कुटुंब नीट चालावे म्हणून तिने पतीसह कुटुंबाची जबाबदारी घेण्यास सुरुवात केली आहे. तारा म्हणते की ती तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करेल आणि संघर्ष आणि मेहनतीपासून कधीही मागे हटणार नाही.
आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासोबतचं तारा आपल्या मातृत्वाला सुद्धा न्याय देण्याच काम दररोज हसत हसत करतेय..
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..