पाकिस्तानी क्रिकेटपटू कामरान अकमलचा बकरी ईद साठी आणलेला 90 हजारचा बकरा चोरीला गेलाय..
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता कामरान अकमलच्या घरातून बकरा चोरीला गेला आहे. त्याने हा बकरा बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्यासाठी विकत घेतला होता. या बकऱ्यासोबत अजून पाच बकरे देखील खरेदी करण्यात आले होते. मात्र ईदच्या दोन दिवस आधीच त्याच्यातील एका बकऱ्याची चोरी झाली. यंदाची बकरी ईद 10 जुलैला साजरी करण्यात येणार आहे.
अकमलच्या कुटुंबियांनी एक दिवस आधी कुर्बानीसाठी सहा बकरे आणले होते. लाहोरमधील आपल्या खासगी हाऊसिंग सोसायटीच्या बाहेर हे बकरे बांधण्यात आले होते. याची राखणदारी करण्याची जबाबदारी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकावर सोपवण्यात आली होती. मात्र रात्री 3 वाजता सुरक्षा रक्षकाला झोप लागली. त्यात दरम्यान चोरट्यांनी अमकलचा एक बकरा चोरला.
दरम्यान, अकमलचे वडील मोहम्मद अकमल यांनी दिलेल्या माहितीनुसार इतर सहा बकऱ्यांपैकी चोरीला गेलेला बकरा सर्वात चांगला होता. त्याची किंमत तब्बल 90 हजार रूपये होती. अमकल परिवाराला त्यांचा चोरीला गेलेला बकरा शोधून आणण्याचे आश्वासन त्यांच्या हाऊसिंग सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने दिले आहे.
अकमल कायम अडकतो वादाच्या भोवऱ्यात
कामरान अकमल यंदाच्या पाकिस्तान सुपर लीग हंगामात देखील वादामुळे चर्चेत आला होता. पाकिस्तान सुपर लीग 2022 च्या हंगामापूर्वी पीसीबीने काही खेळाडूंची श्रेणी बदलली होती. कामरान अकमलची श्रेणी डायमंड वरून गोल्ड करण्यात आली होती. मात्र डाफ्टदरम्यान पेशावर जाल्मीने त्याची गोल्ड श्रेणी बदलून सिल्वर केली होती. यावरून वाद झाला. मात्र नंतर अकमल आणि फ्रेंचायजीमध्ये समेट घडवून आणण्यात आला.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..