
अभिनेत्री नीलम आणि बॉबीदेओल यांच्यामधील नात्यांची कहाणी बॉलीवूडमध्ये कधी काळी मोठ्या प्रमाणात गाजली होती. या दोघांच्या अफेअरच्या चर्च्या शहरांपासून गल्लीपर्यंत सुद्धा झाल्या/ दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. परंतु असं काय झालं की या दोघांनाही वेगवेगळे मार्ग निवडावे लागले.
वेगळे होऊन कित्येक वर्ष झाल्याने खुद नीलमने यावर मोठा खुलासा केला होता. चला तर जाणून घेऊया काय म्हणाली होती नीलम त्यांच्या नात्याबद्दल..
बॉबी देओलने बरसात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्ना होती. फार कमी लोकांना माहिती आहे की, त्या काळात बॉबी बॉलिवूड अभिनेत्री नीलमसोबत गंभीर नात्यात होता. ५ वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

ब्रेकअपनंतर नीलमने स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, बॉबी आणि मी एकमेकांचे नाते संपुष्टात आणले होते. नीलमच्या म्हणण्यानुसार, तिला वाटत होतं की ती बॉबीसोबत आनंदी राहू शकणार नाही.नीलम म्हणाली होती की, 5 वर्षे एकत्र राहिल्यानंतर मला समजले की बॉबी ती व्यक्ती नाही ज्याच्यासोबत मी माझे उर्वरित आयुष्य घालवू शकेन.त्याच्यासोबत राहतांना मला नंतर अस्वस्थ वाटायला लागले होते.
नीलमने सांगितले होते की, अमेरिकेत राहत असतानाच मी बॉबीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तिथून परतल्यानंतर बॉबीशी बोलले आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. बॉबी आणि नीलम हे दोघे त्याकाळी बॉलीवूडमधील सर्वांत चर्चेत असलेले प्रेमी जोडपे होते.
दोघांचे नाते तुटण्यात सनी देओलचा ही होता हात.
अभिनेता बॉबी देओलचा भाऊ सनी देओल हा सुद्धा या दोघांच्या नात्याबद्दल जाणून होता. एका रिपोर्टनुसार सनीला नीलम अजिबात पसंद नव्हती. त्याने आधीही बोबिला तिच्यापासून दूर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही बॉबी आणि नीलम भेटतच राहिले होते. त्यामुळे बॉबीच्या वडिलांना सांगून सनीनेच या दोघांना वेगळे केल्याचं म्हटल जात.
आज मात्र दोघेही आपल्या पर्सनल आयुष्यात आनंदी आहेत. आश्रमच्या माध्यमातून बॉबीने पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलं आहे.तर नीलम बॉलीवूड इंडस्ट्रीपासून लांब आपलं आयुष्य एकांतात जगत आहे..
हेही वाचा:
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..