बॉलीवूड मध्ये स्टार बनलेली प्रियांका चोप्रा आज हॉलीवूड गाजवतेय,ते फक्त या एका चित्रपटामुळे…
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आज 40 वा वाढदिवस. सध्या प्रियांका ही जागतिक सेलिब्रिटी आहे. बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही तिने आपल्या नावाचा डंका वाजवलाय.. 2000 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर प्रियंका चित्रपटांकडे वळली. तिने 2002 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपटातून ग्लॅमरमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ‘द हिरो’ या स्पाय थ्रिलर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आली. हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु हे सर्व होण्याआधी प्रियांकाचं आयुष्यही सामान्य व्यक्तिंसारखं होत.
प्रियांका चोप्रा प्रसिद्धीच्या झोतात आली ती ‘ऐतराज’ चित्रपटातून . 2004 मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ सारख्या रोमँटिक कॉमेडीमध्ये काम केल्यानंतर प्रियांका ‘ऐतराज’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात प्रियंका नकारात्मक भूमिकेत दिसली आणि या भूमिकेने तिच्या करिअरला उंचीवर नेले. प्रियांकाला नकारात्मक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
2005 हे तिच्या कारकिर्दीतील सर्वात व्यस्त वर्ष होते. यादरम्यान, वक्त आणि ब्लफमास्टर सारख्या चित्रपटांसह तिचे सहा चित्रपट प्रदर्शित झाले. 2006 मध्ये प्रियंका ‘क्रिश’ आणि ‘डॉन’ सारख्या दोन सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचा भाग होती.
प्रियांकाने 2007 आणि 2008 मध्येही अपयशाची चव चाखली, तिचे ‘सलाम-ए-इश्क’, ‘लव्ह स्टोरी 2050’ आणि ‘द्रोणा’ हे चित्रपट फ्लॉप ठरले. त्याचवेळी 2008 मध्ये आलेला ‘फॅशन’ हा चित्रपट प्रियांकासाठी टर्निंग पॉइंट ठरला आणि हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर ती बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. प्रियांकाला तिच्या फॅशनमधील सर्वोत्तम अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यानंतर प्रियांकाने ‘डॉन 2’, ‘अग्निपथ’, ‘बर्फी’, ‘क्रिश 3’, ‘मेरी कॉम’ सारख्या चित्रपटात काम केले.
2015 मध्ये, प्रियांका पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा ती अमेरिकन मालिका क्वांटिकोचा भाग बनली. या मालिकेत अॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारून प्रियांकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून, तिने बेवॉच (2017), अ किड लाइक जेक (2018) आणि इजंट इट रोमँटिक (2019), द मॅट्रिक्स रिसरेक्शन यांसारख्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसली, जरी हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यानंतरही प्रियांकाचे बॉलिवूडमधील आकर्षण संपले नाही. . बाजीराव मस्तानीमधील काशीबाईच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
प्रियांकाने आपल्या 20 वर्षाच्या कारीअर मध्ये अनके प्रकारच्या भूमिका केल्या. ज्यात हॉट सिन्स देखील होते. अनेक चित्रपटात तर दिने अतिशय बोल्ड सीन देऊन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
हेही वाचा:
देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..