महिला पत्रकाराने वाजपेयींना ‘लग्न का करत नाहीत? असा प्रश्न विचारला, आणि त्यांनी दिलेल्या उत्तराने सगळेच हैराण झाले..
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आता आपल्यात नाहीत परंतू त्यांच्या बऱ्याच आठवणी मात्र आहेत. कुशाग्र राजकीय बुद्धिमत्ता आणि हजरजबाबीपणा यासाठी अटलजींची ख्याती संपूर्ण देशभरात आहे. वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु १९५१ मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि पत्रकारिता सोडली. राजकीय क्षेत्राव्यतिरिक्त वाजपेयी हे एक ख्यातनाम कवी देखील होते. हार नही मानेंगे, कौरव कोण, कोण पांडव, पंद्रह अगस्त कि पुकार, कदम मिलाकर चालना होगा हे त्यांचे कविता संग्रह आजही लोक आवडीने वाचतात. अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले अटलजी त्यांच्या व्यस्त कामातून ते संगीत आणि पाक कलेला देखील वेळ काढायचे.
त्यांच्या आयुष्यावरील असे अनेक किस्से आहेत त्यामुळे ते आजही आपल्या आठवणीत राहतात. त्यांचा असाच एक रंजक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यांचे एक वैशिष्ट्य असेही आहे की ते आयुष्यभर अविवाहित राहिले. या बाबतीत त्यांना बऱ्याचदा प्रश्नांना सामोरे जावे लागायचे पण त्यांची उत्तरे देखील ते इतकेच गमतीने द्यायचे. एकदा एका महिला पत्रकाराने त्यांना एका मुलाखती दरम्यान प्रश्न विचारला,”तुम्ही लग्न का केले नाही?” त्यावर अटलजींनी तात्काळ उत्तर दिले, “आदर्श पत्नी च्या शोधात आहे” मग यावर महिला पत्रकाराने पुन्हा विचारलं की, “मग मिळाली की नाही?” त्यावर अटलजी उत्तरले, “मिळाली होती पण तिलाही आदर्श पतीचा शोध होता” हे उत्तर ऐकून आजूबाजूला एकच हशा उडाला.

राजकीय इतिहासात एक असाही काळ होउन गेला ज्यावेळी वाजपेयी बोलत असायचे आणि त्यांचे विरोधक ऐकत बसायचे. ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी भारताचे विदेश मंत्री बनले, भाजपाचे संसदेतील अस्तित्व जवळ-जवळ नामशेष होत आले होते तेव्हां बाजपेयींच्या नेर्तृत्वामुळेच भाजपचे संघटन दिवसेंदिवस वाढत गेले.
असे हसत खेळत वावरणारे अटलजी यांनी पन्नासवर्षा हून अधिक काळ राजकीय कारकीर्द गाजवली. १९९४ मध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देखील मिळाला होता. कवि, साहित्यिक, निष्णात राजकारणी, बलवान व्यक्ते, पत्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व होऊन गेले आहेत.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..