Big Boss 19 Updates: कॉमेडी स्टार प्रणीत मोरेची बिग बॉसच्या घरात पुन्हा इंट्री, पहा कधी करणार प्रवेश?

Big Boss 19 Updates: सलमान खानच्या रिअॅलिटी शो “बिग बॉस १९ (Big Boss 19)” मध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. वीकेंड का वार मधून बाहेर पडल्यानंतर, एक मजबूत स्पर्धक पुन्हा घरात प्रवेश करणार आहे. यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.

त्याच्या परतण्याने, या मजबूत स्पर्धकाला पाहून सर्व घरातील सदस्यांना आनंद होईल. या स्पर्धकाने बिग बॉस घर सोडल्यापासून, प्रेक्षक त्याला खूप मिस करत आहेत. आता, तुम्ही विचार करत असाल की, आपण कोणत्या स्पर्धकाबद्दल बोलत आहोत. तर आपणा बोलतोय तो सदस्य आहे स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे!  प्रणित मोरे डेंगूवर मात करून पुन्हा बिग बॉसच्या शोमध्ये परतत आहे.

Big Boss 19 Updates: कॉमेडी स्टार प्रणीत मोरेची बिग बॉसच्या घरात पुन्हा इंट्री, पहा कधी करणार प्रवेश?

Big Boss 19 Updates:  प्रणित मोरे चे बिग बॉसमध्ये पुनरागमन!

प्रणित मोरे बिग बॉसच्या घरात परतला आहे. प्रेक्षक आणि स्पर्धक दोघेही त्याला परत पाहून खूप आनंदित आहेत. त्याच्या परतल्यानंतर, प्रणित बिग बॉसच्या घरात त्याचा कॉमेडी शो “द प्रणित मोरे शो (THE Pranit More Show)0” होस्ट करताना दिसणार आहे.

प्रणितच्या घरात परतण्यासोबतच त्याचा कॉमेडी शो देखील परतला आहे. शिवाय, प्रणितची एन्ट्री अद्याप शोमध्ये दाखवण्यात आलेली नाही, परंतु आजच्या किंवा उद्याच्या भागात हे दाखवण्यात येईल.

Big Boss 19 Updates:  का घराबाहेर पडला होता प्रणीत मोरे ?

गेल्या वीकेंड का वार मध्ये प्रणित मोरेला घरातून बाहेर काढण्यात आले. मात्र नंतर कळले  की, त्याला  बाहेर काढण्यात आले नाही; उलट, तब्येत बिघडल्यामुळे त्याला चांगल्या उपचारांसाठी बाहेर पाठवण्यात आले.

सलमान खानने वीकेंड का वार मध्ये घोषणा केली की, प्रणितला बाहेर काढण्यात येत नाही, तर त्याला उपचारांसाठी बाहेर पाठवण्यात येत आहे. वृत्तानुसार, प्रणितला बिग बॉसच्या घरात डेंग्यू झाला होता, ज्यावर तो फक्त बाहेरच उपचार घेऊ शकला असता. यामुळेच त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले.

Big Boss 19 Updates: कॉमेडी स्टार प्रणीत मोरेची बिग बॉसच्या घरात पुन्हा इंट्री, पहा कधी करणार प्रवेश?

“बिग बॉस १९” च्या आगामी भागात कॅप्टनसी टास्क दाखवण्यात येईल. निर्मात्यांनी फरहाना भट्ट आणि गौरव खन्ना यांच्यातील जोरदार वाद दर्शविणारा एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे.

यासह, अमाल मलिक बिग बॉसच्या घराचा पुढचा कॅप्टन बनला आहे. आता, अमाल पुन्हा एकदा घरातील सदस्यांवर आपला अधिकार लादताना दिसणार आहे. या आठवड्यात घराबाहेर पडण्यासाठी पाच जणांचे नामांकन करण्यात आले आहे: ज्यात गौरव खन्ना, अभिषेक बजाज, अशनूर कौर, नीलम गिरी आणि फरहाना भट्ट यांचा समावेश आहे.


हेही वाचा:

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीमध्ये?,पोर्णग्राफीनंतर या प्रकरणात अडकला राज कुंद्रा..!

Param Sundari Box office Collection: जान्हवी कपूरच्या परम सुंदरीने पहिल्याच दिवशी कमावले तब्बल एवढे कोटी रु..

Leave a Comment

error: