राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवरून काही काळासाठी काढले अन्…,कॉमेडीयन श्रीवास्तव यांच्या तब्येतीबद्दल अधिकृत माहिती अखेर समोर..
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कॉमेडियन राजू श्रीवास्तव नेहमीप्रमाणे जिममध्ये जायचे. यादरम्यान, जिममध्ये वर्कआऊट करत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यावर ते बेशुद्ध पडले. कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना सोमवारी व्हेंटिलेटरवरून तात्पुरते काढून टाकण्यात आले. राजू यांना तासाभरासाठी व्हेंटिलेटरवरून काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, उपचारानंतर 6 दिवस उलटून देखील ते शुद्धीवर आले नाही. राजू यांचे मोठे बंधू सीपी श्रीवास्तव यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “राजूला ताप आला आहे. संसर्ग होऊ नये म्हणून आयसीयूमध्ये नातेवाईकांचा प्रवेश सध्या बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून त्यांना पाईपमधून दूध दिले जात आहे. त्याची लघवी देखील व्यवस्थित होत आहे.”
माध्यमांतील वृत्तानुसार, दिल्ली एम्सच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, राजू यांच्या मेंदूच्या एका भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. मात्र, त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागत नाही. राजू यांच्या बुबुळात आणि घशात थोडी हालचाल आहे. डॉक्टर हे एक चांगले लक्षण मानत आहेत. त्यामुळे राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे स्पष्ट होते.
10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एका हॉटेलमधील ट्रेड मिलमध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हापासून ते एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. एम्सच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, राजू श्रीवास्तव यांचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत आहे. शरीराचे अवयवही पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. रविवारपर्यंत राजूला 20 टक्के ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. आता त्यात आणखी 10% कपात करण्यात आली आहे. म्हणजेच आता त्याच्या शरीराला फक्त 10% ऑक्सिजन सपोर्टची गरज आहे.
राजू श्रीवास्तव यांच्या भावाने सांगितले की, “राजूची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे. हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, त्याच्या मेंदूच्या एका भागाला सुमारे 20 मिनिटे ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना शुद्धीवर येणे कठीण होत आहे. डॉक्टरांच्या मते, त्याला शुद्धीवर येण्यासाठी किमान 7 दिवस किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो.”
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..