या महिला गोलंदाजाने केलेला ‘विक्रम’ आजपर्यंत एकही पुरुष खेळाडू सुद्धा मोडू शकला नाहीये..
क्रिकेटच्या मैदानावर कधी कधी असे विक्रम बनतात, जे मोडणे खरच इतर खेळाडूंसाठी अवघड होऊन बसत. अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक पुरुष खेळाडू आहेत ,ज्यांचे विक्रम आजपर्यंत कोणालाही सहसा मोडता आलेले नाहीयेत. परंतु आज आपण एखाद्या पुरुष खेळाडूच्या विक्रमाची चर्चा करणार नाहीयेत तर आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे महिला खेळाडू ‘डेन व्हॅन निकेर्कची.
आता तुम्हाला वाटत असलं ही महिला नक्की कोण? तर सांगतो ही खेळाडू महिला दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तिने नक्की काय विक्रम केला आणि कसा,हे जाणून घ्यायचं म्हटल तर आपल्याला 2071 सालच्या महिला विश्वचषकात जावं लागलं. त्याचाच हा किस्सा..
आंतरराष्ट्रीय महिला विश्वकप सुरु होता. या स्पर्धेत भारतीय संघासोबतच इतरही अनेक संघ चांगली कामगिरी करत होते. यावेळी महिला विश्वचषकात अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली असून अनेक विक्रमही केले होते या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आजवरचा जगातील सर्वांत मोठा विक्रम झाला. हा विक्रम पुरुष गटात कोणत्याही खेळाडूने केला नाही तर आफ्रिकन संघाची कर्णधार डेन व्हॅन निकेर्कने केला होता. हा विक्रम म्हणजे एकही ‘धाव न देता 4 बळी घेणे’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा विक्रम दुसर कोणीही करू शकलं नाहीये. मग तो पुरुष संघात असो अथवा महिला संघात.
महिला विश्वचषकाचा 12वा सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाला. हा सामना खूपच रोचक होता. या सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या 48 धावांत आटोपला. महत्त्वाची बाब म्हणजे दक्षिण आफ्रिची कर्णधार डेन व्हॅन निकेर्कने शानदार गोलंदाजी करताना विश्वविक्रम केला. ३.२ षटके टाकून तिने एकही धाव न देता ४ गडी बाद केले होते..

महिला क्रिकेटमध्ये अनेक अद्भुत विक्रम आहेत. यामध्ये जर आपण कमीत कमी धावा देऊन जास्त विकेट्स मिळवण्याबद्दल बोललो तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार निकेर्क पहिल्या क्रमांकावर आहे, कारणतिने ने एकही धाव न देता चार विकेट घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ वेस्ट इंडिजचा गोलंदाज कोर्टनी वॉल्शचा क्रमांक लागतो, ज्याने 1 धावात 5 बळी घेतले. त्याचबरोबर भारतीय संघाची खेळाडू दीपा मराठेही त्यांच्या पाठोपाठ आहे. दीपाने 1 धावात 4 विकेट घेतल्या आहेत.
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यात खेळला गेलेला सामना आफ्रिकन संघाने 10 गडी राखून जिंकला होता पण हा सामना ओळखल्या जाऊ लागला तो कर्णधाराच्या या अनोख्या कामगिरीसाठी. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद होईपर्यंत केवळ 48 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकन संघाने ४.२ षटकांत सामना जिंकला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांनी संघाला विजय मिळवून दिला. संघाचा अनुभवी गोलंदाज मारिजनेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. तिने महत्त्वाचे 4 बळी घेतलेले.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..