किस्सा: त्यादिवशी एकनाथ शिंदे स्वतः म्हणाले होते की, “राज ठाकरे कधीच हिंदूहृद्यसम्राट होऊ शकत नाहीत”
शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी मिळून केलेलं बंड काहीही करून संपण्यास तयार नाहीये. एक एक करून ४० ते ४५ आमदार शिंदेच्या पाठीमागे उभे टाकलेत ज्यात ७ मंत्र्यांचाही समवेश आहे. तर दुसरी कडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर सर्वच मंत्र्यांची खाती शिवसेनेतील इतर मंत्र्यांकडे दिली आहेत.
त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना आमदारकी वाचवण्यासाठी कोणत्यातरी पक्षात सहभागी व्हावं लागेल. यात प्रामुख्याने एकनाथ शिंदेसमोर भाजपा आणि प्रहार संघटना हे दोन पक्ष आहे. शिवाय हिदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येण्यासाठी शिंदेसमोर तिसरा पक्ष मनसेच्या रुपात उभा आहे..
अशी माहिती आहे की शिंदे गटातील काही आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता शिंदेगटाकडे फक्त प्रहार आणि मनसे असे दोनच पर्याय आहेत. याचं परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं कळतंय.
आता प्रश्न असा उठतोय की ,राज ठाकरे या सर्व आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश देतील की त्यांची ही ऑफर नाकारतील. तर ही सगळी गणिते अवलंबून आहेत ती शिंदे आणि राज ठाकरे नाच्यातील संबंधावर..
तसं वर-वर पाहिलं तर ठाकरे आणि शिंदे यांचे संबंध तसे चांगलेच.दोघांनीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत काम केलं आहे. शिवाय आनंद दिघे याच्यासोबत दोघांचेही अत्यंत जवळचे संबंध होते.
पण काही अश्याही घटना आहेत,ज्यामुळे राज ठाकरे शिंदेना पक्षप्रवेश देण्यास मनाई देखील करू शकतात.. त्याचं घटनांमधील हा एक किस्सा जो 2022 सालचा आहे..
वेळ होती मनसेच्या अधिवेशनाची. या अधिवेशनात राज ठाकरेंनी मनसेचा झेंडा देखील बदलला होता.. याच अधिवेशनात राज ठाकरेंनी अंगावर हिंदुत्वाची भगवी शाल देखील पांघरली होती. ‘महाविकास आघाडीमध्ये जाऊन शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडतोय’ अशी टीका यावेळी राज ठाकरेंनी सैनेवर केली होती.
या टीकेच्या बदल्यात प्रतिऊत्तर म्हणून शिवसेनेकडून नगरविकासमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्षांना जबरदस्त टोला लगावला होता. “अंगावर भगवी शाल घेऊन कुणी हिंदूहृद्यसम्राट होत नाही, हिंदूहृद्यसम्राट एक होते आणि एकच राहतील, असही यावेळी शिंदे म्हणाले होते.
त्यामुळे ज्या पक्षाच्या अध्यक्षांवर अशी टीका केली आता त्याच पक्षात प्रवेश करण्याची वेळ शिंदेवर येऊन ठेपलीय. राज ठाकरेंच्या सोबत जर जायचं असेल तर शिंदेना स्वतः राज ठाकरेंना आपल्याबद्दल विश्वास मिळवून देण गरजेच झालंय. आता राज ठाकरेही या बंडखोर आमदारांना पक्षात घ्यायचं का नाही हा निर्णय कसा घेतात हेही पाहणे रंजक ठरणार आहे.
हेही वाचा:
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..