Fact Check Virat Kohli gave autograph on Pakistani jersey?: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात रविवार, १९ ऑक्टोबर रोजी आमनेसामने येणार आहेत.
ही मालिका टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) च्या भारतीय संघात पुनरागमनाचीसाक्ष देणारी ठरणार आहे. मालिकेपूर्वी, विराट कोहलीचा पाकिस्तानच्या जर्सीवर स्वाक्षरी (Virat Kohli gave autograph on Pakistani jersey) करतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे आणि व्हायरल झालेल्या फोटोसाठी कोहलीला लक्ष्य केले जात आहे.
विराट कोहलीने खरच पाकिस्तानी जर्सीवर दिला ऑटोग्राफ? (Fact Check Virat Kohli gave autograph on Pakistani jersey)

सोशल मीडियावर फिरणाऱ्या फोटोमध्ये दावा केला जात आहे की कोहली एका चाहत्यासाठी पाकिस्तानच्या जर्सीवर स्वाक्षरी करताना दिसत आहे, परंतु व्हायरल झालेल्या फोटोची वास्तविकता अगदी वेगळी आहे.
Facts Check: तो फोटो एडीट केलेला..!
जेव्हा या [फोटोची शहनिशा करण्यात आली तेव्हा वेगळेच सत्य समोर आले. खर तर हा फोटो विराट कोहलीच्या एका व्हिडीओचा एडीट केलेला स्क्रीनशॉट आहे. मूळ व्हिडिओमध्ये, विराट कोहली हॉटेलमधून बाहेर पडतो, त्याचा क्रिकेट किट टीम बसमध्ये ठेवतो आणि एका चाहत्याकडे जातो ज्याने त्याला स्वाक्षरी करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची जर्सी समोर करतो.
KING KOHLI, THE ENTERTAINER IS BACK. 😂❤️pic.twitter.com/RhHtk7Au66
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 17, 2025
त्यानंतर कोहली जर्सीवर स्वाक्षरी करतो . याच व्हिडीओतील सही करतांना चा स्क्रीनशॉट घेऊन त्या जर्सीला पाकिस्तानच्या जर्सीमध्ये बदलण्यात आले आहे. त्यामुळे विराट ने कोणत्याही पाकिस्तानी जर्सीवर सही केली नसल्याचे सिद्ध झाले आहे..
IND vs AUS मालिकेसाठी विराट कोहलीची जोरदार तयारी..!
विराट कोहली आणि उर्वरित भारतीय क्रिकेट संघाने रविवारपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पर्थमध्ये तयारी सुरू केली आहे.
माजी कर्णधार रोहित शर्मा, कोहली आणि केएल राहुल यांनी नेटमध्ये सराव करताना पाहिले, जे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे प्रतीक होते. विराट कोहली सराव सत्रात बराच सक्रिय होता, त्याने नेटमध्ये चेंडू मध्यम पातळीवर ठेवून सातत्याने आपली फलंदाजी कौशल्ये दाखवली.
विराट आता उद्यापासून सुरु होणाऱ्या पहिल्या एकदिवशीय सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
