Govinda Health Updates: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोविंदाचे व्यवस्थापक शशी शिंदे यांनी अभिनेत्याच्या आरोग्याबाबत अपडेट दिले आहे.
Govinda Health Updates: गोविदाच्या तब्येतीत होतेय सुधारणा?
अभिनेत्याची प्रकृती थोडी सुधारत आहे. मॅनेजर शशी शिंदे यांनीही गोविंदाची प्रकृती कशी बिघडली आणि त्याला काय झाले याबद्दल तपशील शेअर केले. सोशल मीडियावर गोविंदाच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी ऐकताच त्याचे चाहते अधिकच चिंतेत पडले. गोविंदाच्या व्यवस्थापकाने याबाबत नक्की काय म्हटले? जाणून घेऊया सविस्तर..!
#Govinda was rushed to CritiCare Asia Multispeciality Hospital in Mumbai this morning after losing consciousness, reported India Today. As per his lawyer Lalit Bindal, “He was feeling disoriented. All tests are done and we are now awaiting reports and opinion of neuro… pic.twitter.com/Dhv27AoqGz
— Pinkvilla (@pinkvilla) November 12, 2025
नक्की काय म्हणाले गोविंदाचे मॅनेजर?
गोविंदाचे व्यवस्थापक शशी शिंदे म्हणाले,
“त्याला थोडे चक्कर आल्यासारखे वाटले आणि नंतर डोके जड झाले. त्यानंतर त्याला न्यूरोलॉजिस्टकडून मूल्यांकनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर त्याची तपासणी करत आहेत. गोविंदा आता बरा वाटत आहे आणि तो विश्रांती घेत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही; तो लवकरच बरा होईल.

आम्हाला फक्त त्याला चक्कर का येत आहे? हे जाणून घ्यायचे होते, म्हणून आम्हाला त्याला रुग्णालयात आणावे लागले.” एका न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरने त्याला दाखल करण्याचा सल्ला दिला. त्याची मुलगी टीना देखील त्याच्यासोबत आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे शिंदे म्हणाले.
हेही वाचा:
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीमध्ये?,पोर्णग्राफीनंतर या प्रकरणात अडकला राज कुंद्रा..!
