गहू, ज्वारी, टिश्यू पेपर नंतर शेठजींनी आता बँक पासबुकवरही १८ % जीएसटी लावलाय…

गहू, ज्वारी, टिश्यू पेपर नंतर शेठजींनी आता बँक पासबुकवरही १८ % जीएसटी लावलाय…


 

1 जुलै 2017 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जुने टक्स रद्द करत  जीएसटी GST (goods &service tax) आमलात आणला. त्यांतर देशभरात GST हा चर्चेचा विषय बनला. जवळपास 5 वर्षानंतर आता परिस्थिती अशी आलीय की, व्यापारिक असो अथवा दैनंदिनी गरजेच्या वस्तू, तुम्ही श्रीमंत असा की गरीब. त्यावरील जीएसटी  हा तुम्हाला भरावाच लागेल. अर्थातच ग्राहकाकडून तो वेगळा घेतला जाणर नसला तरीही , वस्तूच्या किमती मात्र जीएसटी लावूनच वाढवल्या जातील. त्यामुळे सामान्य माणसांसाठी आता GST हा शब्द थोडासा अवघड वाटतोय.

 

कशावर जीएसटी लागेल याचा भरवसा नाही, असे विनोदाने म्हटले जाते. मात्र, हा विनोद खरा ठरतोय असचं म्हणावं लागेल. तुमच्या बँकेच्या पासबुकावरही आता तुम्हाला तब्बल १८ टक्के जीएसटी भरावा लागेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काही वस्तू स्वस्त, तर काही वस्तू आणि सेवा महागणार असून १८ जुलैपासून पासबुकवरील जीएसटी देखील अंमलात येईल.

हेही वाचा: महेंद्रसिंह धोनी कर्णधार बनताच या 5 खेळाडूंची चमकली किस्मत,आज झालेत अतिशय प्रसिद्ध खेळाडू..

बँक पासबुकचं  नाही तर  ह्या ही गोष्टी होणार महाग:

बँक चेकबुक : चेक जारी करण्यासाठी बँकांकडून आकारलेल्या शुल्कावर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल.

पॅकबंद अन्‍न : दही, लस्सी, पनीर, मध, गहू आणि मांस (गोठवलेले वगळता) यासारख्या प्री-पॅक खाद्यपदार्थ्यांवर पूर्वी सूट होती. आता त्यावर ५ टक्के जीएसटी लागू होईल.

जीएसटी

हॉटेल रुम्स आणि हॉस्पिटल बेडस् : रु. १,००० प्रतिदिवसापेक्षा कमी दराच्या हॉटेल रूम्सवर १२ टक्के जीएसटी लागू होईल. रु. ५००० प्रतिदिवसपेक्षा अधिक दर असलेल्या रुग्णालयांतील खाटांवर ५ टक्के कर आकारला जाईल (आयसीयू वगळून). म्हणजे उपचार घेणे महाग होणार.

एलईडी लॅम्पस् : एलईडी लाईटस् आणि लॅम्पस् यांच्यावरील कर १२ वरून १८ टक्के करण्यात आला आहे. कटिंग ब्लेड, पेपर चाकू आणि पेन्सिल शार्पनरवर १८ टक्के कर आकारला जाईल.
पंप्स आणि मशिन्स : सायकल पंप, टर्बाईन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता १८ टक्के कर आकारला जाईल. सोलर वॉटर हीटर्सवरही १२ टक्के कर आकारला जाईल. आधी तो ५ टक्के होता.

 

यासर्व वस्तूंनवरील GST आता  वाढवल्याने सामन्य नागरिकांना याचा भुर्दंड बसणार हे मात्र नक्की. म्हणूनच GST विरोधात  काही मोठे व्यापारी आंदोलन करत होते.


हेही वाचा:

देशातील सर्वांत मोठ शिवमंदिर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात बांधलं जातंय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top