बिर्याणीचा शोध लागण्याचे क्रेडीट आजही शहाजहानच्या या बेगमला दिले जाते..

बिर्याणीचा शोध लावण्याचं क्रेडीट शहाजहानच्या या बेगमला जाते…


 

बिर्याणी-स्वादिष्ठ मसाल्यांनी बनवलेल्या या भात आणि मांसाच्या मिश्रणाचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. बिर्याणीची चव जेव्हढी स्वादिष्ट आहे, तितकाच मजेदार तिचा इतिहास आणि त्यासोबत जुडलेल्या कथाही रंजक आहेत.

असे म्हटले जाते कि, जेंव्हा तुर्क-मंगोल विजेता तैमुर आपल्या सेनेसोबत १३९८ मध्ये भारताच्या सीमेवर पोहचला होता, त्यावेळी बिर्याणी हे पकवान त्याच्या सेनेचे मुख्य आहार होते. त्याचे सैनिक एका मातीच्या भांड्यात तांदूळ, मसाले आणि मांस यांचे मिश्रण भरून एका गरम खड्डयामध्ये पुरून शिजवायचे.

मुगलकालीन भोजन कक्षांमध्ये बिर्याणीला खूप मन सन्मान मिळायचा. मुघल सम्राट हे त्यांच्या भव्य, दिव्य जीवनशैली आणि विलासी स्वादासाठी ओळखल्या जात, त्यांना सुगंधित तांदूळ आणि नरम मांस मिळून बनवलेली बिर्याणी खूप आवडत होती.

यहां बताया गया है कि मुमताज महल ने आधुनिक बिरयानी बनाने में कैसे मदद की |  भोजन | मनोरमा अंग्रेजी

एक आणखी कथा आहे जी जी, बिर्याणीच्या इतिहासाला भारताच्या दक्षिणी मलबार किनार्यांकडे घेऊन जाते. उन सुरू नावाचे तांदूळ आणि मसालेदार मांसाच्या मिश्रणाचे अनेक पुरावे तमिळ इतिहासाच्या पानात आजही सापडतात.

या सर्व कथांप्रमाणेच, आणाखी एका कथेनुसार बिर्याणीच्या शोधाचे श्रेय हे शहाजहान ची राणी मुमताज महल हिला दिले जाते. असे म्हटल्या जाते कि आपल्या सैनिकांना कमकुवत झालेले बघून, त्यांच्या पोशनासाठी तांदूळ आणि मांस यांना एकत्र करून शिजवण्याचे आदेश तिने दिले होते. आणि या आदेशानुसार जे पकवान बनून तयार झाले त्यालाच आपण बिर्याणी म्हणतो.

 

 

 

तेंव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांच्या आवडीनुसार बिर्याणीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, परंतु असे असले तरी सुद्धा आजही या पक्वनाची लोकप्रियता कमी झालेली नाहीये. सार्वजन आपल्यायेथे मिळणारी बिर्याणी हीच सर्वाश्रेस्ष्ठ आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. यावरु हि गुष्ठ लक्षात येत्ते कि बिर्याणी हि लोकांच्या भावनांशी जुडलेले पकवान आहे.

चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेल्या बिर्याणीच्या प्रकारांबद्दल सविस्तर….

हैदराबादी बिर्याणी.

हैदराबादच्या निजामांच्या किचनमधून आलेली हि बिर्याणी जगभर प्रसिध्द आहे. हैदराबादी बिर्याणी हि मुख्यतः 2 प्रकारची मिळते कच्ची आणि पक्की. कच्या बिर्याणीमध्ये मांसाला मसाले आणि दही यामध्ये रात्रभर मेरीनेट केले जाते, आणि या मिश्रणाला सुगंधित तांदळासोबत मिसळून खास तापमानावर शिजवले जाते.

 

 

पक्की बिर्याणीमध्ये मांसाला कमी वेळेसाठी मेरीनेट करून अलग शिजवले जाते आणि त्यानंतर त्यांना मिसळून दम देऊन शिजवले जाते. ददाम देताना मातीच्या भांड्यांमध्ये बिर्याणीचे थर चढउन भांड्याचे झाकान हे कानिकाच्या गोळ्याने सील करून कमी तापमानावर शिजवले जाते. हैदराबादी बिर्याणी हि सुगंधित केसरयुक्त स्वाद असणाऱ्या भात आणि तिखट मांसाबरोबर सर्व केली जाते.

 

कोलकत्ता बिर्याणी.

आपल्या अनोख्या चवीसाठी प्रसिद्ध असालेल्ल्या कोलकत्ता बिर्याणीची कहाणी हि थोडी दुखादाच म्हणावी लागेल. अवधाचा आखरी नवाब वाजीद आली शाह याला बरखास्त केल्यानंतर त्याच्यासोबत काही आचारी पण होते. नवाब हा स्वादिष्ठ भोजनाचा शौकीन होता परंतु कमाई कमी असल्यामुळे त्यांचे आचारी हे काटकसरीने काम करत होते. बिर्याणीमध्ये त्यांनी आता महागड्या मांसाच्याजागी आलू टाकायला सुरुवात केली आणि तेंव्हापासूनच आलू हा या बिर्याणीचा एक भाग बनला होता.

 

लखनवी बिर्याणी.

 

अवधी विधीच्या विरासतीमधून आलेली लखनवी बिर्याणी हि कमी मसाल्यांनी बनवली जाते. ही बिर्याणी ओलसर बनवण्यासाठी मांस शिजवलेल्या पाण्यात बनवली जाते. मांसाला अगोदर अर्ध कच्चे शिजवले जाते आणि नंतर चक्राची फुले आणि दालचिनी सारख्या मसाल्यांमध्ये मिसळले जाते, शेवटी तांदूळ घालून दम स्टाईलमध्ये शिजवले जाते. यांसारख्या अनेक प्रकारच्या बिर्याणी भारतात प्रसिध्द आहेत.

बिर्याणीचा शोध लागण्याचे क्रेडीट आजही शहाजहानच्या या बेगमला दिले जाते..

थलासेरी बिर्याणी.

ही गोड आणि चवदार बिर्याणी प्रामुख्याने केरळच्या मलबार प्रदेशात बनवली जाते. थलासेरी बिर्याणीची चव अतिशय वेगळी आहे, कारण यामध्ये बासमती तांदळाऐवजी ‘ख्यामा’ किंवा ‘जिराकला’ तांदळाचा वापर केला जातो.

 

या बिर्याणीत चिकन विंग्स, कुरकुरीत तळलेले कांदे, भाजलेले काजू, मनुका, मलबार मसाले आणि एक खास प्रकारची बडीशेप वापराली जाते.तुम्हाला आवडणारी बिर्याणी कोणती आहे? तुअमाच्या ठिकाणी कुठे चांगली बिर्याणी मिळते हे आम्हाला कमेंट मध्ये लिहून सांगा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

मीर कमरुद्दीन: मोगलांविरुद्ध बंड करणारा पहिला निजाम!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top