आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
हा आफ्रिकन योद्धा नसता तर मराठ्यांना ‘गनिमी कावा’ कधी मिळालाच नसता…
मराठ्यांच्या इतिहासात ‘गनिमी काव्याला’ एक वेगळ असं महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज याच गनिमी काव्याने अनेक युद्ध लढले. शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला. पण त्याधीही एका योध्याने गनिमी काव्याचा वापर केला होता. तो म्हणजे आफ्रिकन सरदार मलिक अंबर.
एकेकाळी गुलाम असलेला, पुढे निजामशाहीचा पडता डोलारा सांभाळणारा, सामान्य जनतेला सुखावह शासनपद्धती सुरू करणारा मलिक अंबर! मलिक अंबर हा एक ऍबेसिनिअन(हबशी, सिद्दी) १५४६ च्या असपास बगदाद येथे जन्मला. तिथे त्याला मीर कासीम नावाच्या व्यापाऱ्याने विकत घेतले आणि पुढे अहमदनगर येथील चेंगीजखान नावाच्या निजामशाही सरदाराला विकले.
पुढे तो निजामशाहीत १५० स्वरांचा नायक झाला. दरम्यान आदिलशाहीला जाऊन मिळाला. तेथे त्याला हीन वागणूक मिळल्यामुळे पुन्हा १५९४ मध्ये निजामशाहीत परतला. त्यांनतर त्याच्या साहसी वृत्तीमुळे चांदबीबीने त्याला आपल्या पक्षात करून घेतले.
निजामशाहीत चाललेल्या अनागोंदीचा फायदा घेऊन मुघल सम्राट अकबर ने अहदनगर वर हल्ला केला.
त्यावेळी मलिक अंबर चांदबीबीबरोबर शौर्याने लढला. याच धामधूकीत चांदबीबीचा खून झाला. त्यानंतर बुऱ्हाण निजामशहा चा नातू बहादूर व पुढे त्याचा भाऊ बुऱ्हाण हा निजामशाही गादीवर बसला. या बुऱ्हाण ला गादीवर बसविण्यात मलिक अंबर ने मदत केली होती.
वर उल्लेख केल्याप्रमाणे अकबराने १५९५ साली अहमदनगर ला वेढा घातला आणि अहमदनगर जिंकून घेतले. पुढे मलिक अंबर ने मराठा सरदारांच्या गनिमी कावा या युद्ध पद्धतीने मुघलांना डोंगराळ प्रदेशात खेचून त्रस्त करण्यास सुरुवात केली. गनिमी काव्याचा मोठ्या प्रमाणात वापर शिवाजी महाराजांच्या आधी मलिक अंबर याने केला होता!
मलिक अंबरच्या या सतत च्या हल्ल्यांना कंटाळून पुढे ७-८ वर्षांनी मुघलांनी मलिक अंबर शी तह केला.
मोगलांशी तह झाल्यावर मलिक अंबर ने स्वतःचे लक्ष प्रजेकडे दिले. सततच्या युद्धामुळे प्रजेची ससेहोलपट झाली होती. महसूल गोळा होण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या. पर्यायाने राज्यात आर्थिक तंगी येऊ लागली होती. या अडचणींना तोंड देण्यासाठी मलिक अंबर ने जमिनीची मोजणी करून घेतली.
जमिनीचे बागायती व जिरायती असे दोन भाग करून घेतले. जमिनीच्या उत्पन्नाचा २/५ भाग धान्यरूपाने कर म्हणून घेण्यास सुरुवात केली. मागील कित्येक वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढून प्रत्येक शेतावर सरकारचे नक्त देणे ठरविले आणि ते देणे पण कमीजास्त येणाऱ्या पिकांच्या मनाने कमीजास्त देण्याची सवलत ठरवली.
लोकांना नवीन जमिनी लागवडी खाली आणण्यास प्रोत्साहन देऊन त्या जनिमीवर काही वर्षे सारामाफी दिली. मलिक अंबर ने केलेल्या या सुधारणांमुळे तत्कालीन निजामशाही रयत सुखी झाली होती.
एक हबशी गुलाम म्हणून भारतात येउन पोचलेला पुढे थेट अहमदनगरच्या निझामाचा ‘पेशवा’ झाला.मालोजी आणि विठोजी यांना निझाम ने जुन्नर ची वतन दिले ते मलिक अंबर च्या शिफारशीनंतर. त्या काळात आदिलशाही व निजामशाहित मोठी भांडणे निर्माण होऊ लागली.सुपे परगणा मालोजी राजेंना भेटला ते तिथेच राहू लागले.

निजामशहा मेला व त्याचे सरदार मलिक अंबर व राजू मिआन यांच्यात गादी साठी संघर्ष होऊ लागला.मालोजीराजे मलिक अंबरच्या बाजूने जातील अस वाटल्याने मिआन राजुने मालोजी राजे यांची इंदापूर येथील गडीत हत्या करण्यात आली.
त्यावेळी त्यांचे पुत्र शहाजीराजे केवळ 5 वर्षाचे होते,विठोजीराजेंनी जहागिरीचा संभाळ केला व 1611 ला त्यांचा मृत्यू झाला त्यांनतर ती जबाबदारी शहाजीराजेंवर आली.त्यावेळी शहाजीराजे केवळ 12 वर्षाचे होते.त्यानंतर मलिक अंबर ने त्यांची पाठराखण केली.
27 वर्षाच्या मराठ्यांच्या स्वातंत्र संग्रामनचे आपल्या कौन कौतुक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1680 ते 1707 मध्ये संभाजी महाराज, संताजी ,धनाजी ,राजाराम महाराज, ताराबाई,आणि कित्येकांनी झुंज देऊन मुघलांना लांब ठेवले पण हे आपण करू शकतो हा विश्वास कदाचित मलिक अंबर मुळेच आला असेल कारण १५० मराठा स्वार घेऊन निजामशाही वाढवली मलिक अंबर ने, शाहाजी महाराज आणि त्यावेळचे अनेक मराठा लोकांना घेऊन निजामशाही वाढवली ती मलिक अंबर ने. एकाच वेळी शाहजहान च्या मुघल आणि इब्राहिमशः आदिलशाही यांनी एकत्र केलेला हल्ला थोपवालाच नाही तर त्या दोन शाह्यांना पराभूत केले.
अल्लाउद्दीन खिलजीच्या क्रूर कहाण्या जनतेला दाखवण्याऐवजी जर मलिक अंबरच्या इतिहासाचं अर्ध पानंही जरी इतिहासात वाचून दाखवलं तर एक वेगळा चित्र निर्माण होईल.
या मलिक अंबर चा हिंदूंनी दुस्वास केला कारण तो मुस्लिम म्हणून आणि मुस्लिमांना पण नाकारले करण तो मूळचा अबसैनिया चा (त्याचाच अपभ्रंश हबशी असा होत असे, सध्या त्याला एथोपिया) अस पण म्हणतात मधील गुलाम.नंतर काही काळ मलीक अंबर हे गुलाम होते सउदी अरब येथे, नंतर त्यांनी बगदाद ला विकले मीर कासीम याने.
पुढे त्याला निजमशाहीकडे विकायला आणण्यात आलं, पण निजामाने त्याला विकत घ्यायला नकार दिला. शेवटी त्याला हशमांनी इथेच टाकून निघून गेले. 10 वर्षांचा असलेला मलिक अंबर सुरुवातीला छोट्या चोऱ्यामाऱ्या करून मोठा झाला नंतर त्याने सैन्य जमवलं, सुरुवातीला काही काळकरिता भाडोत्री पद्धतीने अणे लोकांना युद्धात मदत केली.
अहमदनगर च्या एका सरदाराने चंगेज खान(मध्य आशिया मधील नव्हे) त्यांना अहमदनगर वाढवले.त्या सरदारांनी मलीक अंबर यास पुढे आपला वारसदार घोषीत केले. पण एवढा पराक्रमी त्यामुळे तो निजामशाहीचा सेनापती झाला.
अनेक मुस्लिम सत्ताधारी नुसार हा मलिक अंबर आजिबात नव्हता मलिक अंबर ज्यान उभ्या आयुष्यात फक्त एकाच महिलेशी लग्न केलं आणि तो आयुष्यभर तिच्याच बरोबर राहिला त्याच्या जनानखान्यात एकही दासी नव्हती, मलिक अंबर हा स्त्रियांचा पराकोटीचा आदर करायचा अगदी छत्रपतींइतका.
८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबरचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला. मात्र फत्ते खान हा हुशार नव्हता. मलिक अंबर च्या मृत्यू नंतर त्यांच्या कबरी बद्दल अनेक वाद आहेत एक कबर खुल्ताबाद येथे आहे तर एक कबर घाटी दवाखान्यात आहे असा उल्लेख मिळतो.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..