IND vs AUS 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थ येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली (Virat Kohli) ची बॅट चांगली कामगिरी करू शकली नाही. तो ८ चेंडूंत खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला ज्यामुळे त्याचे 200 दिवसानंतर पुनरागमन करण्याचे स्वप्न आजून तसेच राहिले..
या सामन्यात विराट कोहली शानदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, परंतु मिशेल स्टार्कने त्याला बाद केले. सामन्यानंतर, अर्शदीप सिंग पत्रकार परिषदेचा भाग होता, जिथे स्टार खेळाडूने किंग कोहलीचे कौतुक केले. शिवाय यादरम्यान एका ऑस्ट्रोलियन पत्रकाराने विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारला असता अर्शदीपने त्याला ठोस प्रतिउत्तर देत त्याची बोलतीच बंद केली..
विराट कोहली शून्य धावांवर बाद झाल्यानंतर, एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने अर्शदीप सिंगला एक प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर जलद गोलंदाजाने दिले. अर्शदीप म्हणाला की,
विराटने भारतासाठी ३०० हून अधिक सामने खेळले आहेत, त्यामुळे फॉर्म हा त्याच्यासाठी फक्त एक शब्द आहे. त्याला पुढे कसे जायचे हे माहित आहे. त्याच्यासोबत एकाच ड्रेसिंग रूममध्ये असणे नेहमीच एक आशीर्वाद असते आणि मला विश्वास आहे की, तो या मालिकेतही खूप धावा करेल.त्यामुळे एकाच सामन्यात त्याला जज करून काहीही प्रश्न उपस्थिती करू नका..

अर्शदीपचे हे प्रतिउत्तर ऐकताच त्या ऑस्ट्रोलीयन पत्रकारचे तोंड पडल्यासारखे झाले. शिवाय इतर पत्रकार देखील हसतांना दिसले, ज्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
IND vs AUS 1st ODI: एकदिवशीय क्रिकेटबद्दल अर्शदीपने मांडले मनोगत.
एकदिवसीय स्वरूपाबद्दल विचारले असता अर्शदीप म्हणाला की,
तो ज्या स्वरूपामध्ये क्रिकेट खेळत आहे त्यात त्याने प्रभुत्व मिळवले आहे. त्यामुळे, मला माहित नाही की त्याला याबद्दल कसे वाटते. मी त्याच्या भावना विचारेन आणि कदाचित पुढच्या पत्रकार परिषदेत मी तुम्हाला कळवीन.
IND vs AUS 1st ODI: पहिल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव
पावसामुळे सामना २६ षटकांपर्यंत कमी करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ९ गडी गमावून १३६ धावा केल्या. रोहित शर्माने १४ चेंडूत ८ धावा केल्या, तर शुभमन गिलने १८ चेंडूत १० धावा केल्या. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ३१ चेंडूत ३८ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने फक्त २१.१ षटकांत सामना जिंकला.
भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यातील दुसरा एकदिवशीय सामना गुरुवार (23 ऑक्टोबर)) ला ओ ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात विराट आणि रोहित दमदार पुनरागमन करून टीकाकारांचे तोंड बंद करतील, अशी भारतीय चाहत्यांना आशा आहे.
हेही वाचा:
1 Comment
Pingback: MOST ODI MATCH HOSTED CRICKET GROUNDS: एकदिवशीय क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत 'या' 5 मैदानावर सर्वाधिक अंतरराष्ट्री