IND vs AUS 3d T-20: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एक मोठा चमत्कार घडला. गेल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाला टॉस जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. गेल्या 15 हून अधिक सामन्यात टीम इंडिया एकदाही नाणेफेक जिंकली नव्हती. आता मात्र सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून हे दुर्दैव संपवले.

तिसऱ्या टी-२० मध्ये सूर्याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्य याआधी सूर्या नाणेफेक जिंकण्यासाठी बराच काळ संघर्ष करत होता आणि आता त्याचे नशीब अखेर बदलले आहे.
शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्याच षटकात रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला एकमेव पाकिस्तानी खेळाडू..!
IND vs AUS 3d T-20: सूर्यकुमार यादवने टीम इंडियाचे दुर्दैव संपवले, अखेर जिंकली नाणेफेक!
सर्व फॉरमॅटमध्ये, टीम इंडियाने शेवटचा वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत टॉस जिंकला होता. त्यानंतर, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत एकही टॉस जिंकला नाही आणि गिलने सर्व टॉस गमावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्येही सूर्याचे नशीब तसेच होते तो नाणेफेक हरतच चालला होता.

आता टीम इंडियाने ऑस्ट्रोलिया दौऱ्यात सलग पाच टॉस गमावल्यानंतर, सूर्याने अखेर सहाव्या सामन्यात विजय मिळवला. त्याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्याने अखेर टीम इंडियाचे दुर्दैव संपवले.
नाणेफेक जिंकल्याच्या आनंदात सूर्याने मारली ऑस्ट्रोलीयन कर्णधार मिशेल मार्शला मिठी, विडीओ होतोय वायरल..!
Mitchell Marsh hugged and congratulated Suryakumar Yadav on winning the toss. 🤣 pic.twitter.com/X3Qkas9xYE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2025
सूर्यकुमार यादव नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा पराभवाचा सिलसिला संपवल्याबद्दल खूप आनंदी होता. नाणेफेक जिंकल्यानंतर सूर्याने आनंद साजरा केला आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार मिशेल मार्शला मिठी मारली. हा विनोदी हावभाव पाहण्यासारखा होता आणि सोशल मीडियावर या क्षणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
हेही वाचा: