IND vs AUS: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा (ROHIT SHARMA) चा शनिवारी सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना संस्मरणीय होता. रोहितने त्याच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात लक्षणीय यश मिळवले.
त्याने प्रथम क्षेत्ररक्षण करताना शनिवारी मिशेल ओवेन आणि नॅथन एलिस यांना बाद करत दोन झेल घेतले. त्यानंतर फलंदाजीमध्ये ही शानदार शतकीय खेळी करून सामना जिंकून दिला.

या विजयासह रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला असून आता तो दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर,राहुल द्रविड, सुरेश रैना यांच्या यादीत जाऊन पोहचला आहे.
IND vs AUS: एकदिवशीय सामन्यात रोहित शर्माने पूर्ण केले 100 झेल!
नॅथन एलिसचा त्याचा झेल रोहितचा १०० वा एकदिवसीय झेल होता, ज्यामुळे तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० झेल गाठणारा सातवा भारतीय खेळाडू बनला. त्याने त्याच्या २७६ व्या सामन्यात ही कामगिरी केली.

रोहितपूर्वी विराट कोहली (३०५ सामन्यात १६४ झेल), मोहम्मद अझरुद्दीन (३३४ सामन्यात १५६ झेल), सचिन तेंडुलकर (४५६ सामन्यात १४० झेल), राहुल द्रविड (३४४ सामन्यात १२४ झेल), सुरेश रैना (२२६ सामन्यात १०२ झेल) आणि सौरव गांगुली (३११ सामन्यात १०० झेल) यांनी ही कामगिरी केली आहे.
हेही वाचा: