IND vs AUS T-20: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रोलिया दौऱ्यावर आहे. ज्यात भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता २९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत (IND vs AUS T-20) दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा टीम इंडिया या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.
या टी-२० मालिकेमध्ये भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बूमराह (Jaspreet Bumrah) ला एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. ऑस्ट्रोलियाच्या भूमीवर तो हा विक्रम आपल्या नावावर करु शकतो.. नक्की कोणता आहे हा विक्रम जाणून घेऊया..!
IND vs AUS T-20: पहिल्याच सामन्यात जसप्रीत बुमराह रचणार इतिहास?
टी-२० मालिकेत जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करेल. बुमराहविरुद्ध धावा काढणे फलंदाजांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. आशिया कप २०२५ मध्ये बुमराहची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी असली तरी, या मालिकेत तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
IND vs AUS T-20: अश्विनचा मोठा विक्रम जसप्रीत बूमराह मोडणार?
जसप्रीत बुमराहचा तिन्ही स्वरूपात ऑस्ट्रेलियन भूमीवर उत्कृष्ट विक्रम आहे. आता, त्याला एक विशेष टप्पा गाठण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतासाठी सर्वाधिक टी-२० विकेट्सचा विक्रम सध्या रविचंद्रन अश्विनच्या नावावर आहे. अश्विनने तेथे ११ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, बुमराहने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने आठ विकेट्स घेतल्या आहेत. जर त्याने या मालिकेत आणखी चार विकेट्स घेतल्या तर तो या यादीत अव्वल स्थानावर पोहोचेल.
ऑस्ट्रेलियामध्ये भारताकडून सर्वाधिक टी-२० विकेट्स घेणारे गोलंदाज: (Most Wickets Taker Bowlers in Aus)
- रविचंद्रन अश्विन – ११ विकेट्स
- हार्दिक पंड्या – ११ विकेट्स
- अर्शदीप सिंग – १० विकेट्स
- जसप्रीत बुमराह – ८ विकेट्स
हेही वाचा:
